पान:गुन्हेगार जाती.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुजराथ कोळी. ६३ गुन्ह्यांचे क्षेत्रः - पुष्कळ कोळी उद्योगधंद्यासाठीं मोठमोठ्या शहरांत जाऊन राहिले आहेत. कांहीं तर मद्रास, सिंधपर्यंतही गेले आहेत. ते गुन्ह्यासाठीं फार लांबवर जात नाहींत. फार तर घरापासून तीस ते पन्नास मैल फिरतात. ते बहुधा काठेवाड, गुजराथ, रतलाम, माळवा आणि बी. बी. आणि सी. आय. रेल्वेवरील मोठमोठ्या शहरी गुन्हे करतात. ते बरोबर आपली बायकामुलें नेत नाहींत, व आपल्या मित्रां- च्या घरीं किंवा मुशाफर म्हणून धर्मशाळा, देवळें ह्यांत अगर गांवाबाहेर झाडाखालीं उतरतात. लोकसंख्याः—त्यांची लोकसंख्या सुमारें तेरा लक्ष आहे. स्वरूप :- तळब्दे रजपूत किंवा कुणब्यासारखे दिसतात. ते निमगोरे सुरेख, मजबूत, बांधेसूत, चपळ, सरासरी उंचीचे, खातेोपिते आणि काट- कसरी असतात. त्यांच्या बायका नाजूक आणि देखण्या असतात. चुं- वालीये भिल्लांप्रमाणें दिसतात. त्यांच्यांत अद्याप कांहीं बेफाम गुन्हेगार आहेत. ते उंच, चपळ, मजबूत, बांधेसूत व पिंगट असतात. त्यांतील ठाकरडे किंवा जमिनीदार तळब्यांप्रमाणें सुरेख दिसतात. खांत रानटी आहेत, ते भिलांप्रमाणे दिसतात. त्यांचे नाईक मात्र तळव्यांप्रमाणें देखणे असतात. ते काळे, राकट, मजबूत, सरासरी उंचीचे आणि बांधेसूत असतात. ते चोऱ्या फार करतात. पाटणवाडीये काळे, धाडशी, चपळ, मजबूत, कठोर आणि पाणीदार असतात. त्यांचें भिल्ल आणि वाघ्री यांशी साम्य आहे. एकंदर कोळी आळशी, खुशालचेंडू, उडाऊ, छातीबाज, क्रूर, चपळ, कसबी आणि काटक असतात अशी ख्याति आहे. साधारणतः त्यांचा पोषाख म्हटला ह्मणजे जाडाभरडा पांढरा किंवा रंगीत फेटा, बंडी किंवा कमरे- पर्यंत अंगरखा, धोतर किंवा चोळणा आणि जोडा होय. ते लग्नकार्यात मोठें पागोटें घालून खांद्यावर पिचोडी घेतात. काठेवाड, पाटण, चुंवाल- मध्ये थोडे लोक दाढी ठेवितात. पण बहुतेक दाढी करतात आणि कांहींजण कल्ले ठेवितात. गोमांस सोडून इतर मांस कोळी खातात. कांहीं