पान:गुन्हेगार जाती.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२ गुन्हेगार जाती. पोलीस जमवावे. कारण कीं, इतर लोकांना पोलिसला मदत करण्याला धीर पोचतो. तसेंच वजनदार कोळ्यांची सभाही करून पहावें. आपलें कांहीं चालत नाहीं असें कोळ्यांना कळलें ह्मणजे ते पळून जातात, । स्वाधीन होतात. किंवा गुन्ह्याचीं उपकरणः- कोळ्यांजवळ लवंगी किंवा साध्या काठ्या, जुन्या बंदुकी, तलवारी ( खऱ्या किंवा नकली ) असतात. घाटांतील कोळ्याजवळ नेहमी कोयता असतो. चोरीच्या मालाची निर्गतिः-दरोड्यानंतर टोळींतील लोक चोरीचा माल लागलीच वांटून घेतात. कारभाऱ्याचा वांटा इतरांपेक्षां मोठा असतो. वांटणी होईपर्यंत ते माल जंगलामध्यें पुरून ठेवितात. ते चोरीचा माल सोनाराला विकतात. कोंबड्या वगैरे सारखे खाण्याचे पदार्थ चोर- ल्यास ते ताबडतोब खाऊन टाकतात. गुजराथ कोळी. संज्ञाः - गुजराथ कोळ्यांच्या चार पोटजाती आहेत - ( १ ) चुंवा- या किंवा जहांग्रिया, ( २ ) खांत किंवा सरहद्दीवरील, (३) पाटण- वाडिया किंवा अन्हिलपूर कोळी-यांना खोडे किंवा झांगड ह्मणतात- ( ४ ) तळदे, धाराळ किंवा ठाकरडे. यांशिवाय बारीये, दळवाडी, गेडीये, शियाळ, वलकीये वगैरे आणखीही पोटजाती आहेत. वस्तिः- ते गुजराथ आणि काठेवाडभर पसरले असून त्यांची वस्ति उत्तर गुजराथेंत फार व भडोच - सुरतकडे कमी आहे. चुंबालियांचा भरणा अहमदाबाद, काठेवाड आणि बडोदें येथें; खांतांचा काठेवाड व गुजराथच्या इशान्य भागांत; पाटणवाडियांचा खेडा जिल्हा व मध्य गुज- राथेंत आणि तळदे यांचा अहमदाबाद, खेडा आणि बडोदें येथें आहे.