पान:गुन्हेगार जाती.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कोळी. ६१ ते खालीं लिहिल्याप्रमाणें सूड उगवितात:- त्यांची टोळी बहुधा रात्रीं त्याच्या गांवांत शिरते. ते आसपासच्या घरांना बाहेरून कड्या लावि- तात, त्याच्या वह्या जाळतात, जे कांहीं कपडे, पैसे, जवाहीर हातीं लागेल ते घेतात, त्याचा एखादा अवयव कापतात किंवा खूनही करतात, आणि घरांतील बायकांवर जुलूमही करतात. जेव्हां कोळ्यांच्या टोळीचा उद्देश शिधा किंवा खंड उकळण्याचा अगर बायको काढून नेणें वगैरेसाठीं सूड उगविण्याचा असतो, तेव्हां तिच्यांतले लोक तलवारी दाखवून आणि बंदु- कीचे बार किंवा आपटबार काढून गांवकऱ्यांना भिववितात, आणि त्यांना जें लागतें तें उघडपणें मागतात, किंवा जबरदस्तीनें घेतात; अगर ज्यावर सूड उगवावयाचा, त्यावर अतिक्रूरपणाने हल्ला करतात. एका खटल्यांत असें दिसून आलें कीं, एका बाईशीं लागू झाल्याबद्दल एका सधन कोळ्याला बंडखोरांनी रात्रीं घराबाहेर काढलें, पडवींतल्या खांबाला बांधलें, व तलवारीनें त्याला भोंसभोंसकून मारलें. एकदां आठ पोलीसकामगारांच्या ताब्यांतून त्यांनी हल्ला करून बातमीदार नेला आणि त्याला मारलें. बंडखोर टोळ्या आपली बातमी देणाराचा खून करतात, पोलीस लाईनी लुटतात आणि पोलिसचे पोषाख व हत्यारें आपल्या उपयोगाला लावितात. बंडखोराबद्दल एकंदर कोळी जातीला मोठा अभिमान वाटतो. कोणी बंडखोर निघाला ह्मणजे फायदाच आहे असें ते समजतात. कारणः-. ( १ ) व्याजाचा दर उतरत्नो आणि पैसे मागण्याला सावकार निघत नाहींत. ( २ ) फॉरेस्टचे शिपाई जरा भलाईनें वागतात, आणि आपल्या कामांत चालढकल करतात. ( ३ ) हे लोक तेव्हांच उठतात असें नांव पडलें ह्मणजे सरकार जरा ढिल देतें. असें त्यांना वाटतें. कोळी फरारी झाला ह्मणजे त्याचें गांव, त्याच्या बायकोचें किंवा राखेचें गांव आणि त्याच्या आवडीच्या जागा वगैरे ठिकाणीं हत्यारी पोलिस ठेवावे. त्यानें टोळी जमविली ह्मणजे तेथें शक्य तितके हत्यारी