पान:गुन्हेगार जाती.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६० गुन्हेगार जाती. वेषांतर:- गुन्ह्याचे वेळीं ते धाटे बांधतात, बकरीच्या कातडयाच्या मिशा - दाढ्या लावितात, किंवा पोलीस अगर जंगलकडील शिपायांचा जुना काळा किंवा खाकी पोषाख व बूटपट्टी चढवितात. ते हिंदुस्थानी शब्द बोलतात, व मधून हुर्र हुर्र म्हणतात. एका खटल्यांत कोळ्याच्या एका टोळीने पालिसचा काळा पोषाख करून हत्यारे घेऊन आपल्याच- पैकी दोघांना कैदी म्हणून दंडाला बांधून चालविलें. तेव्हां पोलिसची तुकडी म्हणून त्यांना राजरोष गांवचे चावडीवर जातां आलें. गुन्हे:- ते गैर कायदा दारू गाळतात, व किरकोळ चोऱ्या करतात. पण बंडखोर बनल्यावर मिल्लांप्रमाणे ते दरोडे, जबरीच्या चोऱ्या, खून वगैरे करतात. बंडखोर म्हणून कोळ्यानें एकदां नांव कमाविलें कीं इतर कोळी तेव्हांच त्याला सामील होतात. मग ते खेड्यापाड्यांवर हल्ले कर- तात, शिक्षा, पैसे, बंदुकीची दारू यांच्या रूपानें त्यांजकडून खंड उकळ- तात, मारवाड्यांना लुटतात, त्यांच्या वह्या जाळतात, व त्यांची नाकें, कान कापतात. एकटकट फारेस्टचा किंवा पोलिसचा शिपाई सांप- डला म्हणजे ते त्याला झाडाशीं बांधतात, मारतात व लुटतात. को- ळ्याचे बंड मोडणें फार कठिण पडतें. कारण ते कंटक व पायशूर असून त्यांना जंगलांतली वाट ना वाट व दडण्याची जागा माहित असते, आणि भिण्याभावें कीं भक्तिभावें बंडखोरांना त्यांचे जातवाले आश्रय देतात. गुन्ह्यांची पद्धतिः- गुन्हा कोळ्यांनींच केला आहे हें सहज सम- जतें. कारण ( १ ) त्यांचें गुन्ह्यांचें क्षेत्र सबंद मुलुखभर असतें व (२) त्यांत गुप्तपणा बिलकुल नसतो. ते माणसांवर, घरांवर किंवा गांवावर रात्र असो अगर दिवस असो, उघडपणें हल्ला करतात. हल्ला करोवयाचा तेथें ते नीट जातात, आरडाओरड करतात, व जें पाहिजे तें मागून घेतात. ते आपल्या जमावानें व क्रौर्यानें लोकांना कांपरें आणतात आणि लूट मिळाली कीं तडक जंगलचा रस्ता धरतात. अति-काढू सावकाराचा