पान:गुन्हेगार जाती.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कोळी. ५९ पोषाख होय. बायका कुणबाऊ, किंवा धोतराच्या धर्तीवर लुगडें नेस- तात, आणि पदर कमरेला बांधतात, डोकें उघडेंच टाकतात, किंवा त्यावरून फडकी घेतात. त्यांची नथ मोठी असून तिच्यांत पितळेचे किंवा सोन्याचे मणी असतात. त्या बहुधा प्रत्यक्ष गुन्हे करण्यामध्यें सामील नसतात, परंतु क्वचित् एकाद दुसरी फराऱ्याबरोबर जाते. त्या चपल, सोशिक असून त्यांना डोंगरबारीची पूर्ण माहिती असते. पुरु- षांना शिधासामग्री व पोलिसच्या हालचालीची बातमी पोहचविण्यांत त्या फार हुषार आणि अचूक असतात. कोळ्यांचा पोषाख फारसा स्वच्छ नसतो. ते तंबाखू ओढतात, बेतशीर दारू पितात, व आपल्या घरांत दिवा कचित् लावितात. त्यांच्या बायका जातींतल्या जातींत व्यभिचार करतात, व दुसऱ्याचें घरही निघतात. बायकोपायीं तंटे, मारामाऱ्या व खून होतात. बदफैली बायकोमुळे वेळेवर नवरा बंडखोर बनतो. जातीच्या पुढाऱ्याला कोंकणांत " खोत " आणि देशांत “ कारभारी ” ह्मणतात. ते बहुधा केंबळींत राहतात. जे थोडे खाऊन. पिऊन सुखी आहेत, ते कवलारू किंवा पत्र्याच्या घरांत राहतात. सन १८४५ सालीं राघोजी भांगऱ्याचें बंड उठलें. त्यांनीं मारवा- ड्यांचीं नाकें कापलीं. शेवटीं राघोजीला धरून फांशीं दिलें. सन १८७३ सालीं होन्यानें बंड केलें व मारवाड्यांचें काम काढलें. त्याला सन १८७६ सालीं पकडण्यांत आलें. वाण्यांच्या जरब घेण्याला, ळाची जोड मिळाली म्हणजे ते उठाव करितात. दुष्का- भाषा :- ते मराठी भाषा नाकांत बोलतात. त्यांच्यांत सांकेतिक भाषा नाहीं. उपजीविकेचीं बाह्य साधनें :- बहुतेक कोळी शेतकरी किंवा शेतमजूर आहेत. पण ते वाण्यांच्या हातांत गेले आहेत. ते बहुधा हिरडा, गवत, सरपण, जंगलचीं फळें वगैरे विकून निर्वाह करतात. पुष्कळजण उन्हाळ्यांत कंदमुळे खाऊन राहतात किंवा गुन्हे करतात. थोडेजण पोलीस, फॉरेस्ट व शाळाखात्यांत नोकर आहेत.