पान:गुन्हेगार जाती.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कोळी. संज्ञाः - कोळ्यांपैकी फक्त महादेव ऊर्फ राजकोळी आणि गुजराथ कोळी या दोन जाती गुन्हे करणाऱ्या आहेत. महादेव कोळी. वस्तिः- पुणे, ठाणे, कुलाबा, अहमदनगर, नाशिक आणि जव्हार- मधील सह्याद्रीच्या डोंगराळ प्रदेशांत ह्यांची कायमची वस्ति आहे. गुन्ह्यांचें क्षेत्र:- कोळी फिरस्ते नाहींत. त्यांना आपला डोंगराळ मुलूख फार आवडतो. ते देशी भागांत येत नाहींत. कांहीं कोळी मुंबई मजूर आहेत; व बंडखोर कोळी दडण्यासाठी ह्मणून मुंबईस जातात. लोकसंख्याः- नक्की आंकडा तयार नाहीं. स्वरूपः - ह्या जातीच्या बायका व पुरुष मध्यम ते मजबूत बांध्याचे काळे अगर निमगोरे, टणक, ठेंगणे, चलाख असतात. त्यांचे चेहरे सतेज आणि बुद्धिमान् दिसतात, आणि इंद्रियें तीक्ष्ण असतात. त्यांच्यांतल्या पुष्कळ बायका साधारण कुणब्यांच्या बायकांपेक्षां देख- . ण्या, बांधेसूत व नीटनेटक्या दिसतात. डोंगराळ प्रदेशांत रहात असल्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या कष्टांची संवय असते. त्यांना निवळ वाऱ्यावर राहतां येतें असें म्हटलें तरी चालेल, तरी ते मांजरासारखे चपळ असतात. ते एका दिवसांतून डोंगरांत तीस चाळीस मैल सहज काटतात. त्यांना नेम चांगला मारतां येतो. ते बहुधा गरीब, अल्पसंतोषी, उद्यांची फिकीर न करणारे, आणि जातिबंद असतात. धोतर किंवा पंचा, काचा, बंडी, पेहरण, पांढरें किंवा रंगाचें पोगाटें, घोंगडी किंवा पासोडी, हा पुरुषांचा पोषाख होय. कोंकणांत धोतर किंवा लंगोटी, पागोटें किंवा रुमाल आणि घोंगडी हा त्यांचा नेहमींचा