पान:गुन्हेगार जाती.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कातकरी. ५७ गुन्हे:- ते घरफोडी, धान्य, शेळ्या मेंढ्या व कोंबड्या यांची चोरी करतात. तंबूंत चोऱ्या करण्यांत ते पटाईत आहेत. ते गुपचुप कनातींतून येऊन तंबूतल्या लहानशा पेट्या व हातीं पडेल तें सामान लांबवितात. कधीं कधीं ते जंगलाच्या अति- काढू मक्तेदाराला जंगलांत लुटतात, आणि गाड्याव वाटसरू आडवितात. पण ते बहुधा फार ठोकमार करीत नाहींत. ते बहुशः मोठीशी टोळी अगर बातबेत करून गुन्हे करीत नाहींत. आणि कचित् फरारी होतात. अलीकडे कुलाबा जिल्ह्यांतील कोपोल गांवचा जान्या नांवाचा सोने कातकरी बंडखोर निघाला होता. पैसा सांपडण्या- च्या आशेनें एका युरोपियनाची कबर फोडल्याचा कातकऱ्यांवर संशय होता. गुन्ह्याची पद्धतिः- चोरीबरोबर खाण्याचे जिन्नस आणि शिज- विलेलें अन्न, कोंबड्या, बकरीं, हीं नाहींशी झालीं, किंवा गुन्ह्याच्या जागीं बांबू अगर कोयता सांपडला म्हणजे कातकऱ्यांनी गुन्हा केला असें समजावें. कातकरी उंच वर्णाच्या हिंदूचें स्वयंपाकघर विटाळी नाहींत. ह्याशिवाय त्यांचे पद्धतींत कांहीं विशेष नाहीं. गुन्ह्याची हत्यारें:- विळा, कोयता, पहारई, तीरकामठा हीं होत. गुन्ह्याचे मालाची निर्गतिः - ते आपल्या बायकांमार्फत चोरीचा माल सोनार, कलाल, पाटील यांना विकतात. ते मांसळीच्या पाठीच्या बुडाशी माल लपवून फक्त चोरीचा माल घेणाराला विकतात. कधीं कधीं गुडध्यामागें किंवा पायाच्या पोटरीला चोरीचा माल फडक्यानें गुंडाळून ते लंगडत लंगडत जाऊन सोनाराला विकतात. सबब लंगड्या कातकऱ्यावर पोलिसाची नजर असावी. चोरीच्या कोंबड्या व शेळ्या- मेंढ्या ते मारून खातात, किंवा गांवच्या लोकांना विकतात.