पान:गुन्हेगार जाती.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६ गुन्हेगार जाती. त्यांच्या कानबाळ्या सोन्याच्या कानबाळ्यापेक्षां लहान असतात. ढोरां- च्या बायका पायांत पितळेच्या सांखळ्या घालतात. सोन्याच्या घालीतं नाहींत. कातकरी घाणेरडे असून गांवाबाहेर राहतात. त्यांच्या घरांत सामानसुमान कांहीं नसतें. घरदार करून राहिलेले कातकरी गवताच्या झोपड्या करून राहतात. त्यांच्या वस्तीला कातवाडी झणतात. ते नाचणी, वरी, सावा, कंदमुळे खाऊन राहतात. त्यांना शेतांतले उंदीर, खारी, कांहीं जातीचे सरड, व मुंगूस आवडतात. कांहीं माकडेंही खातात. पैसे असले तर ते दारूंत व तंबाखूंत उडवितात. कातकरी ह्मणजे जंगल- चा बच्चा होय. कातकरी मेला ह्मणजे ते म्हणतात कीं ब्राह्मणाच्या 'जन्माला जाशील तर लिहूं लिहूं मरशील, कुणब्याच्या जन्माला जाशील तर नांगरूं नांगरूं मरशील, इत्यादि, असा प्रत्येक जातीचा कांहींतरी आयब काढून शेवटी ह्मणतात कीं कातकऱ्याच्या जन्माला जाशील तर जंगलचा राजा होशील. जातप्रकरणी पंचायत भरवून ते आपल्या " नायका" चे तंत्रानें चालतात. त्यांच्याशीं व्यवस्थेनें वागलें म्हणजे ते एकमेकांविरुद्ध पोलिसला बातमी देतात. भाषा :- ते मराठी नाकांत बोलतात आणि प्रत्यय गाळतात. सांकेतिक भाषा :- त्यांच्यांत सांकेतिक भाषा आहे. ते माशांला सारो आणि मासे धरणाऱ्याला लोघैला म्हणतात. उपजीविकेची बाह्य साधनें:- पुष्कळ सोने कातकरी शेतकाम करतात. ते जंगलचीं फळेंमुळें, सरपण व खैराचा कात काढतात, लां- कडें तोडून कोळशे पाडतात, मासे धरतात, व भुईंतील शिकार करतात, आणि शिकार विकून भात नागली खावयाला घेतात. उन्हाळ्यांत ते मजु- रीनें शेतांचे बांध दुरुस्त करतात. शिवाय खळें उलगडल्यावर ते शेतांत सांडलेला भात वेंचतात, आणि उंदराच्या बिळांतील धान्य काढतात. वेषांतरः- गुन्ह्याचे वेळीं ते घाटे बांधतात.