पान:गुन्हेगार जाती.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कातकरी. ५५ कुलाबा या जिह्यांत आहे. बाकीची पुणे, सातारा, रत्नागिरी व त्यांमधील संस्थानें ह्यांत आहे. गुन्ह्यांचें क्षेत्र:- ह्यांचा उपद्रव उत्तर कोंकणांतील जंगलांत व डोंगरांत फार आहे. गुन्ह्यासाठीं ते सुरत, नाशिक, अहमदनगर, सोला- पूर, पुणे, कुलाबा, रत्नागिरी, धरमपूर, दमण वगैरे ठिकाणीं हिंडतात. तळापासून दहा ते पंधरा मैलांवर ते गुन्हा करतात. ते बहुतेक फिरस्ते आहेत. परंतु बरेचजण खेड्यांच्या आसपास घरदार करून राहिले आहेत. लोकसंख्या:- कातकरी सुमारें साठ हजार व काथोडी सोळा हजार आहेत. स्वरूपः- कातकऱ्यांना कष्ट पुष्कळ पडतात आणि खावयाला पुरेसें मिळत नाहीं, त्यामुळे तरुणपणांत जरी ते बांधेसूत, मजबूत आणि टणक दिसतात, तरी ते लवकर खंगतात. ते सडपातळ, मध्यम उंचीचे, आणि फार चपळ असतात. त्यांचा रंग काळवट व जरा सतेज, डोळे खोल, नाक चपटें, ओंठ भरदार व केंस कुरळे असतात. पुरुषाला, लंगोटी आणि डोक्याला एक फडकें असतें. त्यांच्या अंगावर कधीं कधीं फाट- लेली कर्पी ( बंडी ), उपरणें किंवा जुनी घोंगडीही असते. ढोर कातकरी हजामत करीत नाहींत. बाकीचे करतात, आणि शेंडीला गांठ मारतात. ढोर कातकरी गळ्यांत आणि मनगटाला काळी पोत घालतात, इतर घालीत नाहींत. बायका आंखड लुगडें नेसून घट्ट कासोटा बांधतात, आणि पदर खांद्यावरून, क्वचित् डोक्यावरून उरावर काढितात. त्या बहुधा सणावाराशिवाय चोळी घालीत नाहींत, परंतु गांवाजवळ राहिलेल्या आणि बन्या स्थितींतल्या कातकरणी चोळ्या घालतात. त्यांच्या गळ्यांत चित्रविचित्र पोत असते. कांहीं कातकरणी बांगड्या, पितळेचे गोठ, वांक्या, बुगड्या, काप व बुचड्याला पितळी गुंड्या घालितात. ढोरांच्या बायका हातांवर गोंधतात व फक्त कांचेच्या बांगड्या घालतात.