Jump to content

पान:गुन्हेगार जाती.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ गुन्हेगार जाती. त्यांच्या गैरहाजिरींत मिळालेल्या लुटीचा वांटा त्यांना पोंचवितात. गुन्हा करतांना एखादा मेला तर त्याचा मुलगा किंवा दुसरा माणूस गुन्हा करण्याजोगा मोठा होईपर्यंत त्याच्या कुटुंबाला वांटा मिळतो. कैकाड्यांना पोलीस ठाण्यांची व जिल्ह्यांची हद्द चांगली माहीत असते. एका जिल्ह्याच्या सरहद्दीवर तळ देऊन ते दुसऱ्या जिल्ह्याच्या सरहद्दीवर गुन्हा करतात. मोठ्या टोळ्या बहुधा संस्थानच्या सरहद्दीवर तळ देतात. गांव पोलीस व गांवकरी यांशीं, वेळेवर तालुक्यांतील कामगारांशीं कैकाड्यांची दोस्ती असते, त्यामुळे गुन्ह्याचे तपासाला पुष्कळ अडचण पडते. दरोडा मारल्यावर जर कांहीं तपास वगैरे चालू नसला तर कैकाडी देवीची मोठी जत्रा करतात, आणि बायकांपोरांसुद्धां यथेच्छ दारू पितात. दारूच्या कैफांत ते बरीच हकीकत बरळतात. सबब पोलिसांनी असल्या जत्रांच्या टेहळणीवर असावें. अटकेंतल्या कैकाड्यां- वर फार जपून पाहरा करावा. कारण ते वाटेल ती युक्ति लढवून निसटून जातात. नुकतेच तेरा असामी तुरुंगांतून खालीं लिहिल्याप्रमाणें निस- टले. तेरा इसमांना एका कोठडीत ठेविलें. एकानें कबुलीजबाब देऊन माल दाखविला. रात्री आठ वाजतां सर्वजण मारामारी करूं लागले. ज्याने कबुलीजबाब दिला तो पहारेवाल्यास ह्मणाला ' मला जर दुसऱ्या कोठडीत ठेविलें नाहीं तर मी मेलों. ' वटहुकुमाविरुद्ध पहारे- कऱ्यानें दार उघडलें आणि तेराही इसम दाराकडे धांवले, पहारे- कऱ्याच्या तोंडावर मडकें आपटलें, आणि सर्वजण पळून गेले. त्यांपैकीं फक्त एकजणाला तेव्हांचे तेव्हां पकडलें. तात्पर्य, कैकाडी तुरुंगांत भांडू लागले कीं दार उघडण्यापूर्वी सर्व पहारेकरी गोळा करावेत ह्मणजे त्यांना पळून जातां येणार नाहीं. गुन्ह्याचीं हत्यारेंः- गुन्हे करण्यासाठीं कैकाडी काठ्या नेतात, व गोफण, धोंडे, चवाळ्यांत किंवा धोतरांत घालून ते कंबरेला गुंडाळतात. शिवाय त्यांजवळ कोयता, कुन्हाड, सुन्या, पहारी, म-