Jump to content

पान:गुन्हेगार जाती.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

6 कैकाडी. ५३ शाली आणि सांपडल्यास बंदुका तलवारीही असतात. त्यांच्याजवळ कंगट्टी, " पंसकोल्लु,' किंवा ' शिल्लाकल ' ( सुमारें एक फूट लांबीची टोंकाकडे चिंचोळी होत गेलेली पहार ) असते.. महाराष्ट्रांतल्या कैका- 'ड्यांजवळ एक ओबडधोबड शिडी किंवा एखादा लहान झाडाच्या फांद्या तोडून त्याचा चढण्याकरितां केलेला वांसाही असतो. त्यांच्या कुन्हाडीला दांडा बहुधा नवीन लाविलेला असतो, आणि काठचाही नवीन तोडलेल्या असतात. शेतकऱ्यांच्या गोफणींपेक्षां त्यांच्या गोफणी लहान असतात. कड्डी कोर्व्यांच्या बायकांजवळ कुलपें उघडण्यासाठीं खिळा किंवा किल्ल्यांचा जुडगा असतो. चोरीच्या मालाची निर्गतिः- चोरीचा माल ते दरींत, नाल्यांत शेतांत, जंगलांत, स्मशानांत किंवा उकिरड्यांत पुरतात, आणि कांहीं दिवसांनीं गांवकामगार, सावकार, कलाल, सोनार यांच्या मार्फत तो फुंकून टाकतात. कैकाडी आतां सोनें, चांदी गाळावयाला शिकले आहेत. पुरलेला माल लवकर बाहेर काढण्याचा संभव नसला तर रुपया कापून तो लोखंडाच्या तुकड्यासह तेथें पुरतात, म्हणजे मालाला भूतबाधा होत नाहीं, अशी त्यांची समज आहे. मराठे, पाटील किंवा देशमुख यांचा वेष घेऊन मुंबईसारख्या शहरांत कैकाडी माल विकतात. तसेंच टोळीं- तली एखादी देखणी व हुषार बायको लिंगायतणीचा पोषाख करून गहाण जमीन सोडविण्याच्या मिषानें चोरीचा माल राजरोस विकते. एका सोनारानें कैकाड्याच्या टोळीबरोबर जाऊन त्यांजवळील माल चोरी झाल्याबरोबर संकेतस्थानीं विकत घेतला. एकदां कैकाड्यांनीं चोरीचा माल घोड्याच्या तांग्यांतून नेला. पूर्वी चुली, अंथरुणें, पालाच्या मेखा, वळीमूठ (खोगीर) यांच्याखालीं कैकाडी माल पुरून ठेवीत असत. एका प्रसंगीं चोरलेले दागिने व तीस रुपये कैकाड्यांनीं सुपाटोपल्यांच्या कांठांत विणले आणि गोधडींत शिवले. कैकाड्यांचें एकमेकांत इमान नसतें. टोळीतील इसम कधीं कधीं एकमेकांच्या चोरून चोरीचा माल