पान:गुन्हेगार जाती.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कैकाडी. ५१ हल्ला करून, तें हिसकावून घेतो. टोळींतील लोक बैल किंवा घोडे सोडून गाडी उलथतात, मुशाफरांना ठोकतात, त्यांच्या अंगावरचे मूल्यवान् जिन्नस हिसकून घेतात, व बोभाटा करूं नये ह्मणून कधीं कधीं त्यांना झाडाला बांधून ठेवितात. नंतर सर्वजण कपडे ठेवलेल्या ठिकाणीं जातात, व कपडे घेऊन जे निघतात, ते सुमारें वीस मैलांवर मुक्काम करतात. अशा रीतीनें अनेक रस्त्यांवर दरोडे मारून ते आपल्या तळाला परततात. अशा प्रसंगी त्यांच्याबरोबर बायका नसतात, रात्रीं दरोडा घालतात. 'बहुधा दिवसां व क्वचित् कड्डी कोर्व्याच्या बायका बड्या चोर असतात. त्यांच्या नायक- णीला चार वांटे मिळतात, आणि तिच्या नवऱ्याला दोन वांटे मिळ- तात. त्या भीक मागतां मागतां घराचीं कुलुपें काढून चोऱ्या करतात. त्यांची चोरीची एक रीत अशी:- ज्या घरांत थोडीं माणसें असतील त्याच्या मागच्या दारीं कांहींजणी बसतात, व कांहीं पुढच्या दारीं भांडून एकमेकींना रक्त निघेपर्यंतही मारतात. अर्थात् घरचीं माणसें तंटा तोडण्याला बाहेर येतात तों मागच्या दारी असलेल्या कोर्विणी आंत शिरून हातीं लागेल तें घेऊन चालत्या होतात. तळ सोडण्यापूर्वी पामलोर आणि कल्लकोर्वे आपल्या चुलीच्या तीनचार दगडांचा एक असे ढीग घालतात, आणि कपाळाला राख फांसतात. विड्याच्या पिचकाऱ्या खूप दिसल्या किंवा जवळपास आग अगर आकड्याच्या पानांच्या पत्रावळी दिसल्या ह्मणजे पामलोरांचा तळ होता असें समजावें. कैकाडी बहुधा कबुलीजबाब देत नाहींत. ते जिकडे तिकडे सामसूम होईपर्यंत चोरीच्या मालाची वांटणी करीत नाहींत. दुसऱ्या जातीचे जे लोक त्यांना सामील होतात, त्यांना ते रोकड देतात. महाराष्ट्रांतील कांहीं टोळ्यांमध्ये सर्व लूट नाईक घेतो, आणि टोळींतील इसमांना व त्यांच्या कुटुंबांना खाणें पिणें दारू, मांस पुरवितो. कांहीं टोळ्यांमध्यें नायकाला दोन वांटे मिळतात. टोळींतल्या कैकाड्यांना शिक्षा झाली तरी