पान:गुन्हेगार जाती.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० गुन्हेगार जाती. वून ते घरांत प्रवेश करतात. महाराष्ट्रांतले कैकाडी भिंतीच्या तळाला धावें घेऊन त्यांतून आंत जातात. आंत घुसलेले इसम घर धुंडाळतात, तोंपर्यंत बाकीचे इसम चोहोंकडे पाहरा करतात. कर्नाटकामध्ये कैकाडी रुमाली पद्धतीनें घरफोडी करतात तिला 'मनकलू' झगतात; आणि बगली पद्धतीनें घरफोडी करतात तिला 'नोंदबक ' ह्मणतात. पहिल्या पद्धतीनें भिंतीच्या तळाशीं धावें घेऊन आंत शिरतात आणि दुसऱ्या पद्धतीनें चौकटीजवळ भोंक पाडून आंत हात घालून दाराची कडी काढतात किंवा आगळ सारतात. कोणी जागा होऊन मारण्यासाठीं उभा आहे कीं नाहीं हें पहाण्यासाठी आंत जाण्यापूर्वी काठीला कांबळी गुंडाळून ती आंत घालतात, ह्मणजे बसला तर काठीला टोला बसावयाचा. पामलोर आणि कल्लुकोर्वे हे घरफोडींत अट्टल आहेत. ते भिंतीला जें धारें पाडतात तें फार मोठें नसून नीटनेटकें असतें. कैकाडी लोक बाय- कापोरांवर हात टाकीत नाहींत, व मंगळसूत्र, केकतकेवडा आणि जोडवीं - विरुया नेत नाहींत. ते बाकीचे दागिने निर्दयपणे काढतात. जर एका घरीं कांहीं हातीं लागलें नाहीं तर दक्षिणी कैकाडी दुसया घरावर छापा घालतात. रस्त्यावर दरोडा :- कोर्चे आणि कड्डी कोर्वे रस्त्यावर दरोडा मारण्यांत फार पटाईत आहेत. ते पांच तें पंचविसांची टोळी करून ज्या रस्त्यावर दरोडा घालावयाचा त्यापासून दोन तीन मैलांवर एखाद्या एकांत लपण्याच्या ठिकाणीं जातात. तेथें फाजील कपडे काढून ठेवितात. तेथून त्यांचा बेर्मुन्सा गांवापासून लांब अशा सोईस्कर रस्त्याच्या भागावर टोळी नेऊन तिचे दोन तीन भाग करून, त्यांना थोड्या थोड्या अंतरावर बसवितो, आणि आपण एक इसम बरोबर घेऊन रस्त्यावर बसतो. गाडी, ताँगा, किंवा लुटण्याला योग्य असा वाटसरू आला ह्मणजे तो इशारत देतो. त्या बरोबर सर्वजण लपलेल्या ठिकाणांतून बाहेर पडतात. वासराजवळ हत्यार असल्यास देर्मुन्सा त्याजवर