पान:गुन्हेगार जाती.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

6 कैकाडी. ४९ ह्मणून क्रैकाडी घरांतल्या सर्व माणसांना गोळा करून एका खोलींत कोंडतात, व तिला कडी लावून घेतात; अगर मालक किंवा दुसरा माहीतगार इसम माल दाखवीपर्यंत त्या गोळा केलेल्या इसमांवर कांहीं- जण पाहरा करतात. त्यानें माल दाखविला नाहीं तर, , ते त्याचे अति- शय हाल करतात. याप्रमाणें इकडे असें चाललें आहे तो दुसरे लोक पेट्या फोडतात. आणि बायकांच्या अंगावरचे दागिने काढून घेतात. निघून जाण्याची इशारत देण्यासाठी नाईक महाराष्ट्रांत ' नडा' किंवा खूष ' आणि कर्नाटकांत ' काळ्या ' किंवा ' फैल ' ह्मणतो. त्या- बरोबर सर्वजण घराबाहेर गोळा होतात. सर्व आले असें पाहून नाईक हुकूम करतो, ( कर्नाटकांत 'पांजरा' ह्मणतो) आणि सर्व टोळी संकेतस्थानीं व तेथून तळावर जाते. माग लागूं नये ह्मणून ते बहुधा सकत जमिनीवरून जातात. ज्यांच्याजवळ चोरीचा माल असतो ते मध्यें चाल- तात व इतर त्यांच्या बाजूनें चालतात. पोलिसला झुकविण्यासाठीं ते गुन्ह्या- च्या ठिकाणीं परजातीचे कपडे किंवा परठिकाणचे जोडे टाकतात, आणि चोरीच्या मालापैकीं फोल जिनसा संकेतस्थानीं फेंकून देतात. तसेंच वाटेवरच्या गांवाजवळ कांहीं चोरीचा माल ते कधीं कधी टाकतात. तळ लांब असला तर परत जातांना टोळींतील एखादा दुसरा माणूस वाटेवरच्या खेड्याच्या दुकानांतून गूळ, शेंगादाणे वगैरे विकत आणतो. आणि सर्वजण एखाद्या एकांतस्थळीं ते कसें बसें खाऊन पुढें चालते होतात. कैकाडी बहुधा एका गांवांत एकापेक्षां अधिक घरें लुटीत नाहींत. एका खटल्यांत असें दिसून आलें कीं फिर्यादीचे घरी एका कैका- ड्यानें लहानसान कामें केलीं व पुढें तो नाहींसा झाला. कांहीं दिवसांनी त्याच्या टोळीतले इसम एकेक दोनदोन निरनिराळ्या वाटांनी एका संकेतस्थानीं जमले आणि गुन्हा करून आले तसे गेले. त्यांना एक ब्राह्मण सामील असावा असा संशय आला होता. घरफोडी:-धाब्याला धारें पाडून शिरावयाचें असल्यास त्या धान्य- वर एक काठी आडवी ठेवितात आणि तिला पागोटें किंवा दोरी लटका- ४