पान:गुन्हेगार जाती.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ गुन्हेगार जाती. किंवा आपली अगर झटापटीत घायाळ झालेल्या किंवा मेलेल्या साथी- दाराची सुटका करून घेण्यासाठीं वेळेवर कैकाडी खून सुद्धां पाडतील. त्यांना त्वेष फार चढतो. मोठी दुखापत झाली असेल, बांबू अगर ताज्या तोडलेल्या काठ्या टाकून दिलेल्या असतील, विड्याच्या पिच- काय दिसत असतील, किंवा घरचे जोडे चोरीस गेले असतील तर कैकाड्यांनी दरोडा घातला असें समजावें. ते बहुधा रात्री ८ ते १२ वाजेतों, आणि क्वचित प्रसंगी मोठ्या पहांटेस दरोडा घालतात. तळाच्या नीट रस्त्यापासून एकीकडे आणि दरोड्याच्या ठिकाणा- पासून सुमारें एक मैलावर ते एक संकेतस्थान ठरवितात. गुन्हा करण्या- पूर्वी त्या ठिकाणी टोळीतले लोक जमून आपापले फाजील कपडे काढून ठेवितात, आणि कोणी काय करावयाचें वगैरेसंबंधानें टोळींतल्या लोकांना नाईक समजूत देतो. महाराष्ट्रांत कधीं कधीं ओबडधोबड शिडी किंवा चढण्याचा वासा कैकाडी आपल्याबरोबर नेतात. दरो- ड्याच्या घरांत ते मागच्या भिंतींनीं धाब्यावरून उतरतात, आणि कुन्हा- डीनें किंवा दगडांनी दारें फोडून इतरांना रस्ता खुला करून देतात. कधीं कधीं आसपासच्या घरांना बाहेरून कड्या लावितात, आणि रस्त्यांत कांटे पसरतात. कोणी ओळखूं नये ह्मणून गुन्हा करतांना ते कंबर कसतात, धाटे बांधतात आणि तोंडाला राख किंवा पिंवडी फांस- तात. त्याचप्रमाणे, “ कालेखान संभाळो, जमादार, बताव, मारो, गरीब लोक मत आव बंदुक भरो ” वगैरे हिंदुस्थानी शब्द ते वापरतात. टोळीतील कांहीजण घरावर आणि घराबाहेर गर्दी करतात. त्यांच्याजवळ मशाली असून ते कुन्हाड, पहार किंवा मोठ्या दगडांनी खिडक्या दरवाजे फोडतात. दुसरे कांहीं वाटेवर गोफण एकसारखी चालवितात, आणि जो मध्यें आडवा येईल त्याचें काम काढतात. महा- राष्ट्रांतले कैकाडी कधीं कधीं आपटबारही काढितात. माल कोठें ठेविला आहे हे समजण्यासाठीं आणि घरांतलें माणूस बाहेर जाऊं नये.