पान:गुन्हेगार जाती.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कैकाडी. ४७ पेवें फोडून त्यांतील धान्य ते लांबवितात आणि दरोडे घालतात. त्यां- च्या बायका भीक मागतांना चोऱ्या करतात. कुंची कोर्वे, ऊरकोर्वे किंवा वाजंत्री बहुधा मोठासा गुन्हा करीत नाहींत. कोर्चे रस्तालूट करतात आणि दरोडे घालतात. ढोरें, शेळ्या, मेंढ्या चोरण्यांतही ते पटाईत आहेत. ते पामलोर किंवा कल्लकोर्वे ह्यांना दरोड्याचे काम सामील होत नाहीत. गुन्ह्याची पद्धति - घरावर दरोडा :- टोपल्या विकतांना आणि जातीं उकटतांना कैकाडी, पामलोर आणि कल्ल कोर्वे ह्यांच्या बायका घर शोधून ठेवितात, आणि त्याची खबर आपल्या पुरुषांला देतात. जर तिन्हाइतान खबर दिली तर टोळींतील एकजण पहिल्यानें त्या घराची नीट पाहणी करतो, पण केव्हां दरोडा घालावयाचा हे त्या बातमी दे णाराला ते कळू देत नाहींत. घराची पाहणी करणारा इसम टोळीतल्या इसमांना त्या घराचा नकाशा जमिनीवर काढून दाखवितो. कधीं कधीं- कोठें दरोडा घालावयाचा याची खबर कैकाडी तुरुंगांतच दुसऱ्या कैद्यां- कडून मिळवितात, आणि तेथेंच सुटकेनंतर घालावयाच्या दरोड्याब- द्दल बेत ठरवितात. खबर लागल्यावर त्यांच्या पायपिटीला सीमा नसते. ते बहुधा रात्री वाट चालतात. हमरस्ते व पोलीस भेटतील अशी ठि- काणे ते टाळतात. घरीं पोंचण्यापूर्वी उजाडलें तर ते एखाद्या एकांत- स्थली किंवा जंगलांत दडतात, अगर टोळी फोडून वेगवेगळे चालून जातात. दरोड्याचें ठिकाण फार लांब असलें तर ते कांहीं मजलपर्यंत बैलगाडी करतात आणि तिला बोकड बांधतात, जणूं काय यात्रेला नि- घाले आहेत. फेरीला निघण्यापूर्वी ते शकुन पाहतात. भवानीची आरा- धना करून जेवण करतात आणि खूप दारू झोडतात. कर्नाटकांत ते कुन्हाड आणि कंगट्टी यांची पूजा करतात तिला ' गवी ' ह्मणतात. दरोडा मारल्यावरही याचप्रमाणे ते पूजा व जेवण करतात. अशा प्रसंगी महाराष्ट्रांत सत्यनारायण करतात. गुन्ह्याचे वेळीं माल काढण्यासाठीं