पान:गुन्हेगार जाती.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ गुन्हेगार जाती. आपण घोंगडी तुणणेवाले, मराठे, गोसावी किंवा जंगम आहोंत असें भासवितात. कल्लुर्वे आणि पामलोर हे लिंगायत, जंगम यांचा वेष- धारण करतात, आणि आपण नशीब सांगणारे, शंखघंटाधारी दास्सये, शास्त्रीगोळ, वैद्य, सनादी वाजविणारे वाजंत्री आहोत असे दर्शवि- तात. या वेषानें त्यांना घरांत व देवळांत जातां येतें व खबरही मिळते. कधीं कधीं ते आपणांला धनगर, कुंची अगर वाजंत्री कोर्वे म्हणवितात. महाराष्ट्रांत कैकाडी एकटे किंवा जोडीनें मारवाड्याच्या वेषानें व कर्ना- टकांत घरंदाज मराठ्याच्या वेषानें सोयरीक पाहण्याचा बाहणा करून हिंडतात. पामलोर आणि कल्लकोर्वे एखाद्या गांवांत मन्याराचें दुकान घालतात आणि गांवाचा ठाव घेतात. सावकारासारखा पोषाख करून ते कसबिणींच्या घरीं उतरतात आणि खबर काढतात. कैकाड्यांना टोपणनांवें फार असतात. एखादी कैकाड्यांची टोळी चैनींत दिसली आणि तिच्यांतले घट्टे- कट्टे पुरुष वरचेवर नाहींसे होतांना दिसले म्हणजे ती गुन्हेगार आहे असें समजावें. ज्या कैकाडवाड्यांत बहुतेक बायका, मुलें व थकले- भागलेले म्हातारे दृष्टीस पडतात त्यालाही वरील नियम लागू पडतो. विचारपूस केल्यास बायका स्वच्छ सांगतील कीं, आमचे नवरे व मुलगे मेले. तरी पण पोलिसने पाळतींत कसूर करूं नये. गुन्हे :- कैकाड्यांच्या टोळ्या आसपासच्या पिकांची चोरी करतात आणि शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या चोरून त्या लगेंच मारून खातात. हे लोक अज्ञान मुलें चोरून तीं गरजूंना विकतात. महाराष्ट्रांतील कैकाडी आणि कर्नाटकांतील पामलोर आणि कल्लको हे निधड्या छातीचे, पाषाणहृदयी, पिढीजाद दरवडेखोर आहेत. ते रस्तालूट व घरफोडी करतात, खऱ्या म्हणून पितळेच्या मोहरा व मणी विकतात, आणि चोरीचा माल घेणारांना भरंवसा देऊन एकांतस्थलीं नेऊन लुबाडतात. कड्डी कोवें, पिकें व शेळ्यामेंढ्या ह्यांची चोरी आणि रस्तालूट करतात.