पान:गुन्हेगार जाती.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कैकाडी. ४५ समजावें. किंवा एखादें पान अगर डाहाळी तोडून तिजवर एक दगड ठेवून नजरेस पडेल अशा ठिकाणीं हैं ठेवितात. जिकडे पानाचें अगर डाहाळीचें टोंक तिकडे टोळी गेलेली असते. जेव्हां रस्ता सोडून जंग- लांतून व डोंगरांतून भटकावें लागतें तेव्हां ते थोड्या थोड्या अंतरावर झाडांची पानें पसरतात, म्हणजे मागच्या लोकांना माग लागतो. उपजीविकेची दर्शनीं साधनें:- चटया विणणें, कोष्ट्यांच्या कुं- च्या, ओबडधोबड पाट्या व कणगी करणें आणि कधीं कधीं जातीं वि- कर्णे, उकटणें वगैरे कामें ते करतात. कोठें कोठें कैकाडी पोलिसांतही नौकर आहेत. महाराष्ट्रांत कांहीं वाजंत्री असतात, कांहीं शेतकी व मातकाम करतात. कैकाडी आपल्या जमिनी बहुधा दुसऱ्यांना लावितात. कांहीं कैकाडी माकडासापाचे खेळ करतात, आणि खो- ड्यांत जनावरें पकडतात. कांहींच्या बायका कसब करून घर चाल- वितात. मुंबई इलाख्याच्या बाहेर या जातीचे कांहीं लोक कसरत कर- तात. कर्नाटकांत कल्लको चटया, टोपल्या करतात. कड्डी कोर्बे चटया करतात व त्यांच्या बायका भीक मागतात. कुंची कोर्वे पुंगी वा- जवून पायांत घुंगरे घालून नाचतात व भीक मागतात. ते माकडाचे खेळ करतात, शिकार धरतात, दोरखंडे, मुलांच्या कुरकुल्या, शिंकीं, व कोष्टट्याच्या कुंच्या करतात. त्यांच्या बायका गांवांत गोंधून व नशीब सांगून पैसे मिळवितात. कोर्चे, चटया, सोल, शिंकीं व धान्याची ने आण करतात आणि ढोरें विकतात. पामलोर पुंगी वाजवून सापाचा खेळ करितात आणि भीक मागतात. वाजंत्री कोर्चे घरदार करून राहिले आहेत. ते शेतकाम, वाजंत्रीपणा, शिंदीच्या पाट्या, दोरखंड, केरसुण्या, शिंकीं वगैरे करतात. वेषांतरः- महाराष्ट्रांत कैकाडी आपणांस वडार म्हणवितात, आणि बतावणी पुरी करण्यासाठीं त्यांच्या बायका चोळी घालीत नाहींत. पुरुष चोळणे घालतात व टिकाव घेऊन फिरतात. एकटे दुकटे हिंडतांना त