पान:गुन्हेगार जाती.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ गुन्हेगार जाती. ह्मणजे त्याला कल्लकोर्वे आणि पामलोर ह्यांच्या सांकेतिक खुणा खालीं लिहिल्या- प्रमाणें आहेत :- पोलिस येत आहे, हें दर्शविण्यासाठीं ते तोंड मिटून रात्र- किड्याप्रमाणें आवाज काढतात. पळून जा, हें दर्शविण्यासाठीं ते तोंडाला हात लावितात, किंवा कांहींसा घुबडाप्रमाणे व कांहीं कोल्ह्याप्रमाणें आवाज काढतात. गचांडी धरली असतां, ते तळहाताचा मोठचानें मुका घेऊन मुंगसाप्रमाणें आवाज काढतात; ह्मणजे मागें राहिलेले लोक धांवून येतात. दडल्या ठिकाणाहून ते तोंडाला हात लावून लहान मुला- च्या रडण्याप्रमाणें आवाज काढतात. त्यामुळे वाटसरू इकडे तिकडे पाहतो आणि त्याचे अंगावरचे दागिने दृष्टीस पडतात, लुटण्यांत कांहीं जीव आहे किंवा नाहीं हें उघड होतें. लांबच्या मनु- ष्याला बोलावणें झाल्यास ते भालूसारखा आवाज काढतात. दग्याचे भीतीनें पांगलेली टोळी गोळा करणें झाल्यास ते खोकडासारखा किंवा घुबडासारखा आवाज काढतात, अगर शिटी फुंकतात. आंत सांपडले- ल्या घरफोड्याला दग्याची इशारत देणे झाल्यास ते मांजरासारखें किंवा शेळीसारखें ओरडतात. नाहींसा हो, असें जोडीदाराला परक्यां- समक्ष सुचविणें झाल्यास कपाळ खाजवितात. अमुक बाजूला जा हैं। कपाळ खाजवितांना त्या बाजूला कोंपर करून सुचवितात. तळ मोडून टोळी कोणत्या दिशेने गेली हें मागून येणाराला कळावें म्हणून ते खालीं लिहिल्याप्रमाणें चिन्हें करितात:- झाडाची डाहाळी मोडून ती चुलीच्या दगडांजवळ ठेवितात, आणि डाहाळीजवळ काटकोनांत एक पाऊल वठविलेलें असतें. जिकडे टोळी गेली, त्या दिशेला डाहाळीचें मोडलेलें टोंक असतें. जेथें दोन किंवा अधिक रस्ते मिळतात, तेथें पटाजवळ एक कर्डे काढून त्यांतून मधोमध नीट रेघ ओढतात म्हणजे कड्याबाहेर आलेल्या रेघेच्या टोंकाच्या बाजूला टोळी गेली असें समजावें पावलाच्या कडेनें मुसभुशीत जमिनीवर एक रेघ काढतात आणि तिच्या शेवटीं पाऊल वठवितात. जिकडें पाऊल त्या दिशेला टोळी गेली असें