पान:गुन्हेगार जाती.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कैकाडी. ४१ व कल्ल कोर्वे आपल्या झोंपड्या गांवाच्या ज्या विशेष भागांत ते राह तात, तेथें फार कसबानें बांधतात. एकमेकांस लागून त्या अशा रीतीनें बांधल्या जातात की त्यांमधून ताबडतोब एकमेकांस खबर पोंचवितां येते. कल्ल को नदीनाल्यांजवळ झाडाखालीं उतरतात, आणि गुन्हा केल्याबरोबर तळ मांडतात. त्यांच्याबरोबर बायकापोरें नसतात. क्क- चित् सैंपाकाकरिता एखाददुसरी तरुण स्त्री ते बरोबर घेतात. कड्डी कोर्वे गवताच्या किंवा बोरूच्या पालांत सहकुटुंब सहपरिवार उतरतात. त्यांच्या गोण्यांच्या पदरांना बाहेरून कातडें लाविलेलें असतें. कुंची कोही गवताबोरूंच्या पालांत सहकुटुंब सहपरिवार राहतात, शिवाय त्यांचेबरोबर डुकरें, माकडे असतात. कोर्चे चटयांच्या पालांत सहकुटुंब सहपरिवार राहतात. त्यांच्याबरोबर बरेच गोणीचे बैल असतात. पामलोरांच्या कांबळ्यांच्या पालांवर खादी टाकलेली असून दोन्ही तोंडां- समोर चटयांचे पडदे बहुतकरून बांधतात. त्यांच्याबरोबर बायका- मुलें, गाईबैल, तट्टे, कुत्रीं, ओझ्याचीं गाढवें वगैरे असतात. कैकाडी मध्यम ते पुऱ्या उंचीचे, बांधेसूत, धट्टेकट्टे, अति चपळ व श्रमसहिष्णु असतात. त्यांचे कान व नजर तिखट असते. बायका आणि पुरुष काळे, गदळ असतात व अव्यवस्थित रीतीनें राहतात. गाय, बैल, म्हैस वर्ज्य करून ते सर्व प्रकारचें मांस खातात, आणि खूप दारू व ताडी पितात. कल्ल कोर्वे आणि पामलोर यांच्यांत बेटीव्यवहार होतो; बाकीच्या जातींत फक्त रोटीव्यवहार होतो. महाराष्ट्रांत पुरुष धोतर किंवा चोळणा नेसतात, बारबंदी घालतात, अंगवस्त्र पांघरतात, आणि रुमाल किंवा पागोटें बांधतात. त्यांच्याजवळ कधी कधी हसवी ( खारवी बटवा ) असते. बायका चोळी घालतात व कासोटा न घालतां लुगडें नेसतात. त्या अंगावर भरपूर गोंदतात. कर्ना- टकांत कड्डी व कुंची कोर्वे लंगोटी नेसतात आणि कांचा कसतात; ते डोक्याला रुमाल बांधतात आणि खांद्यावर धोतर किंवा घोंगडी घेतात.