पान:गुन्हेगार जाती.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ गुन्हेगार जाती. कोर्चे बहुधा चड्डी किंवा चोळणा घालतात; व लंगोटी घातली तर वरून धोतर गुंडाळतात. ते अंगांत अंगरखा व डोक्याला रुमाल घालतात, आणि कांबळी किंवा हाचडा (पासोडा) पांघरतात. पामलोरांचा पोषाख अंगरखा, अंगवस्त्र, रुमाल आणि डाव्या खांद्यावरून लटकणारी झोळी हा होय. इतर कैकाडणींप्रमाणें कोर्त्यांच्या बायका कांहीं चोळी घालीत नाहींत, आणि लुगडें अस नेसतात कीं, आंतला पदर डावीकडून उजवी - कडे निघून खांद्यावरून उरावर येतो व स्तन झांकतो. त्या गळ्यांत पोत व हातांत पितळी बांगड्या घालतात. त्या कांचेच्या बांगड्या घालीत नाहींत. पामलोरांच्या बायका चोळी घालतात व लुगड्याचें कमळ काढतात. कैकाडी व कोर्वे यांच्या बायका पुरुषांप्रमाणें राकट असून गुन्ह्याचे कामांत पुरुषांना हर प्रकारची सांथ करण्यांत मोठ्या पटाईत असतात. टोपल्या वगैरे विकण्याच्या मिषानें दारोदार हिंडून गुन्ह्यासंबंधाची बातमी काढणें, माल लपवून त्याची विल्हेवाट करणें, दग्याची व पोलिसच्या हालचालीची बातमी आपले पुरुषांला देणें, प्रसंगानुरूप पोलिसाला झुक- विणें किंवा त्यांना व्यत्यय आणणे, पुरुषांना भाकरी पोंचविणें, त्यांना काय पाहिजे याचें धोरण बांधणें वगैरे सर्व कामें त्या मोठ्या चतुराईनें करतात. त्या स्वजातींत व्यभिचार करितात. टोळीच्या तर्फेनें बोल- ण्याचें काम बहुधा एखाद्या मोहक तरुणीवर सोपविलें असतें. जिकीर- खोर पोलिसला किंवा गांवकामगारांना मुठींत आणण्याला हवें तें कर- ण्याची तिला मुभा असते. जो गुन्हे करण्यांत अट्टल व बोलण्यांत हुशार अशा इसमाला ते नाईक करतात; आणि त्याचा हुकूम सर्वजण पाळतात. सोलापुराकडे पुढारीपण कांहीं बायकांकडे आलें. नायकाला उघड रीतीनें वावरतां येत नाहीं, अशा वेळीं त्याचें काम त्याची बायको करते. कल्लु कोर्व्यात नायकाला ‘ रंगाएट, ' पामलोरांत ' पुलाकुंज, ' कोयत ' बेरमुन्सा, ,,