पान:गुन्हेगार जाती.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४० गुन्हेगार जाती. वस्तिः- महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, निजामशाही, मद्रास, मैसूर, बऱ्हाड व मध्यप्रांत ह्यांत ते सांपडतात. गुन्ह्यांचें क्षेत्र:- वर लिहिलेल्या मुलुखांत ते गुन्हे करतात. आपल्या तळापासून सुमारें तीस मैलांवर व चांगली शिकार मिळण्याचा संभव असला तर रेल्वेनें प्रवास करून शंभर मैलांवरही कैकाडी गुन्हे करतात. ते आपल्या तळाजवळच्या गांवांत गुन्हे करीत नाहींत. तळाच्या जवळपास एखादें घाऊक घर दिसलें तर ते तेथून तीस चाळीस मैलांवर मुक्काम हल- वितात. आणि नंतर सुमारें एक महिन्याच्या आंत बाहेर त्या घरांवर छापा घालतात. ह्या जातीला भारी वळवळ असते आणि त्यांच्या टोळ्या खूप लांबवर पायपीट करतात. पुणे जिल्ह्यांत गुन्हे केलेले कैकाडी व-हाडांत सांपडले आणि सोलापुरांतले बल्लारीत हातीं लागले. पण ते मोकार हिंडत नाहींत. त्यांना खबर देणारे चहूं मुलुखीं आहेत. आणि जिकडील खबर येते तिकडे ते जातात. गांव कैकाडी, उर को आणि पुष्कळ चोर कैकाडी व कल्ल कोर्वे हे गांवांतून कायमची वस्ति करून राहिले आहेत. बाकीचे फिरस्ते आहेत. लोकसंख्याः- ह्या जातीची गणति सुमारें सव्वीस हजार आहे; पण हा आंकडा बरोबर नसावा. स्वरूप :- ही जात हाडची गुन्हेगार व फिरस्ती आहे, सहकुटुंब सहपरिवार बायकापोरें, गाईबैल, तट्टे, गाढवें, कोंबडी, बकरें, कुत्रीं, वगैरेसह त्यांच्या लहान मोठ्या टोळ्या महाराष्ट्र व कर्नाटकांत भटक- तात. आपलें सामान व पालें ते गाढवावर नेतात. आणि गांवापासून दूर उंचावर पाण्याजवळ तळ देतात. कुंची कोर्व्यांचा मात्र गांवाजवळ तळ असतो. बेळगांव, धारवाड, विजापूर, सोलापूर, या जिल्ह्यांत त्यांचा सुळसुळाट फार आहे. तसेंच कोंकणांत त्यांचे हेर पुष्कळ असल्यामुळें ते कधीं कधीं घाटाखालीं उतरतात. स्वसंरक्षणाकरितां आणि येणारे संकटाची एकमेकांस ताबडतोब बातमी देतां यावी ह्मणून, चोर कैकाडी 4/2616&