पान:गुन्हेगार जाती.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कैकाडी. ३९ होईल तितके लवकर ते जमलेल्या रुपयांच्या मोहरा किंवा सॉव्हरिन विकत घेतात. तसेंच ते आपली कमाई पोस्टमार्फत गुन्हा न केलेल्या ठिकाणाहून पाठवितात. त्यांच्या गांवचे पाटील त्यांना पाठीशी घालून पोलीसला झुकवितात. एका छप्परबंदानें सर्व मनीऑर्डरी पाटलाच्या बाय- कोच्या नांवानें करून आपल्या घरीं रुपये पोहोंचते केले. कधीं कधीं ते टोळीतील एका इसमाजवळ आपली कमाई देतात, आणि तो सोनें खरेदी करून घरीं घेऊन जातो. ह्मणून जर एखादा उप्परबंद अवेळीं घरीं आला तर त्याजवर चांगली नजर ठेवावी. कैकाडी. संज्ञा :- महाराष्ट्रांत कैकाड्यांच्या पोटजाती खालीं लिहिल्याप्रमाणें आहेतः- ( १ ) चोर कैकाडी ऊर्फ फिरस्ते किंवा डोंटलमोर; ( २ ) गांव कैकाडी ऊर्फ बुटी, टोपले कैकाडी; यांपैकीं वाजंत्री काम करणारांना वाजंत्री किंवा सनादी कैकाडी म्हणतात, व घरदार करून राहिले त्यांना गृहस्थ कैकाडी म्हणतात; (३) कुचडी कैकाडी किंवा कुंचीवाले; (४) माकडवाले; ( ५ ) कूथ ( माकड ) कैकाडी यांना लालबाजारवाले किंवा गनसूर म्हणतात; ( ६ ) तेलंगण किंवा कामाठी कैकाडी हे क- र्नाटक किंवा मद्रासेकडील फिरस्ते कोर्चे, कोर्वे व पामलोर लोक होत. कर्नाटकांत कोर्त्यांच्या अगर कोर्व्यांच्या पोटजाती खालीं लिहिल्या- प्रमाणें आहेत:- ( १ ) कोर्वे अथवा कल्ल (चोर) कोर्वे. ( २ ) कड्डी अथवा अगडी कोर्वे. ( ३ ) कुंचे कोर्वे. ( ४ ) कोर्चे. ( ५ ) पामलोर. (६) वाजंत्री, सनादी किंवा उर कोर्वे. ह्या प्रत्येक पोटजातींत चार कुळ्या किंवा गोत्रें आहेत - (१) साथपाडी, (२) मेलपाडी, (३) कावाडी व (४) केंद्रगुट्टी. म. म. द. वा. पोतदार ள் ள்ள