Jump to content

पान:गुन्हेगार जाती.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. ३८ गुन्हेगार जाती. पैसे मिसळतात. दुकानांत जाऊन पहिल्यानें खरे रुपये दाखवून माल घेतात, आणि पैसे देतांना त्यांचे ऐवजी खोटे देतात. इंग्रजांखेरीज इतर राजांचीही खोटी नाणीं ते चालवितात. यात्रा वगैरे गर्दीच्या ठिकाणीं ते आपला धंदा चालवितात. एका टोळीला एका फेरींत दोन हजार रुपये मिळाल्याची वदंता आहे. आपला रोजगार उघडकीस येण्याची भीति वाटली तर ठसे वगैरेचा नायनाट करून ते स्वतःही नाहीसे होतात. गुन्ह्यांची उपकरणे:- कात्री, मोठ्या पानाची सुरी, चिमटा, सांडस, पळी, खापरी, कटोरी, कानस, बांबूच्या नळींत लपविलेल्या सुया, आळशीचें तेल, डिंक, कासें, खोटी नाणी पाडण्याच्या कामी लागणारे धातू व माती, काळी भुकटी, सहाण, फुंकणी, काटकोनी नळी, कसोटी, पारा, शिसें, जस्त, गंधक, कोळशाची फकी, मऊ कातड्याचा तुकडा, उजळा देण्यासाठी मीठ किंवा रेती, कांहीं " हल्ली शिक्का ” “ राजशाही " रुपये व सांचे वगैरे सामान छप्परबंदांजवळ सांपडतें. सांच्यासाठी लागणारी माती, तिच्या मण्यांची माळ करून, किंवा तिचा लहानसा दर्गा किंवा महाल करून, ते बरोबर वागवितात. त्यांच्याजवळ मातीची भुकटी तशीच सांपडली तर ती एखाद्या दर्ग्यातून प्रसाद ह्मणून आणली असें सांगतात. त्यांच्या रोज- गाराची हत्यारें कातडी पिशव्यांत असतात. गुन्ह्याचे मालाची व्यवस्थाः-छप्परबंदांच्या टोळीला अटक केली ह्मणजे हातांत बेड्या घालून त्यांना एकमेकांपासून दूर बसवावें. नाहीं तर ते कलागत काढून गोंधळ करतात, आणि त्यांत त्यांना सांचे, खोटीं नाणीं वगैरे लांबविण्याला फावतें. छप्परबंदांच्या लंगोटीच्या पुढच्या पदराला एक लहानसा चोरखिसा असतो. त्यांत ते खोटें नाणें व रुपये लपवितात. त्याचप्रमाणें ते गुदद्वारांत व तोंडांत पैसे लपवितात, आणि वेळेवर ते गिळतातही. जुलाबावाटे पडलेले रुपये ते पुन्हां गुदद्वारांत लपविणार नाहींत याविषयीं खबरदारी घ्यावी.