पान:गुन्हेगार जाती.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

छप्परबंद. ३७ .तिच्या खिशांतल्या घड्याळाएवढ्या दोन वाटोळ्या थापट्या करतात. खऱ्या रुपयाला तेल लावून तो त्या दोन थापट्यांत पाव इंच खोल थोडा वेळ दाबदाबून त्यांचा सांचा करतात. आणि पुढें त्याचे दोन्ही भाग जुळण्यांत चूक होऊं नये ह्मणून कडेला खुणेची रेघ काढतात. -नंतर आंतला रुपया काढून घेतां येईल अशा रीतीनें तो सांचा आडवा कापतात, आणि धातूंचा रस आंत ओतण्यासाठी लहानशी पन्हाळी त्यांत कोरतात. नंतर तो राखेंत वाळवितात, आणि त्याला चिंध्या गुंडाळून त्याचा खंगर होईपर्यंत भाजतात. उपयोग करण्याचे वेळीं सांचे एका ओळीनें शेणांत उभे करतात, तेव्हां धातूंचा रस ओतण्यासाठीं पन्हाळीचें तोंड वर असतें. पळीमध्यें तांब्याचा किंवा काशाचा आणि कथलाचा रस करून तो सांच्यांत ओततात, आणि सदर नाणें बाहेर काढून कान- शीनें किंवा चाकूनें त्याच्या बाजूच्या कडा नीट नेटक्या करतात. जुनीं दिसावीत ह्मणून कधीं कधीं हीं नाणीं काळीं करतात. एका सांच्यांतून अजमासें दहा ते वीस नाणीं पाडतां येतात. अर्थात् असली नाणीं बद, बेरंग, हलकीं व गोबरीं असतात. खोटीं नाणीं पाडण्याचें काम कोणी न येईल अशा ठिकाणीं गुपचुप उरकण्यांत येतें; व तेथें पाळतही ठेवण्यांत येते. म्हणून आंघोळीच्या किंवा देवदर्शनाच्या निमित्तानें पोलिसनें तेथें जावें. अशीं थोडीं खोटीं नाणी तयार झाली म्हणजे छप्परबंद फकीर एखाद्या बाईला गांठतो, आणि तिला बट्टा कबूल करून तिचा रुपया घेऊन तिला खुर्दा देतो. नंतर तिला सांगतो कीं तूं दिलेला रुपया आमच्या मुलुखांत चालत नाहीं, आणि खुर्दा परत घेऊन हातचलाखीनें तिनें दिलेला रुपया ठेवून 'घेऊन खोटा रुपया तिच्या पदरांत टाकतो. खोटी नाणीं चालविण्याच्या त्यांच्या कांहीं युक्त्या अशा आहेत :-विक्रीसाठीं कांहीं जिन्नस घेऊन ते बाजारांत जातात, सौदा ठरून पैसे हातांत पडले म्हणजे मग तो मोडतात, आणि गि-हाइकाचे पैसे परत देतांना हातचलाखीनें त्यांत कांहीं खोने