पान:गुन्हेगार जाती.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ गुन्हेगार जाती. डगमगतां सांगतात की, आम्ही मदारी फकीर आहोंत, व सवाल म्हणून भीक मागतों,ळाकंवा अस्वले शिकवितों, अथवा गुलबर्गा, अजमीर, हिमा- लय वगैरे ठिकाणी पिराचे दर्शनाला चाललों. दोन किंवा अधिक एक- दम पकडले तर जो तो आपापली वेगळी हकीकत सांगतो. ते आपले नांव, गांव चोरतात, व बहुधा आपल्या ऐवजीं बापाचें नांव सांगतात. परंतु खोटी नाणी चालवितांना हातचलाखीत चूक झाली, म्हणजे भ्रमाचा भोंपळा फुटतो. अशा रीतीनें सांपडलेल्या छप्परबंदावर नजर ठेवून त्वरित झाडा घ्यावा म्हणजे टोळींतले बाकीचे इसम हाती लागतात. मिळाले तितक छप्परबंद सरकारानें हजिरींत घातले आहेत, व त्यांच्या बोटांचे ठसे घेतले आहेत. तत्रापि वहिमी छप्परबंदाबद्दल खात्रीची माहिती मिळविण्यासाठी मे. पोलीस सुपरिटेंडेंटसाहेब विजापूर ह्यांचे- कडे सदर इसमांचे सहा फोटो पाठवावेत; आणि त्यांच्या बोटांचे ठसे फिंगर प्रिंट ब्यूरोकडे पुणे येथे पाठवावेत. गुन्हेः-सांच्यांचे योगानें खोटे रुपये, अधेल्या, पावल्या, चवल्या पाडणें हा छप्परबंदाचा मुख्य बंदा होय. पण संधि सांपडली तर, सुन्या, भांडी, बूट, कपडे, तहें वगैरेची चोरी व ठकबाजीही ते करतात, व निराश्रित बायकामुलें पळवितात. फारच पिच्छा पुरविला तर ते सांगतात कीं, मुलें विकत घेतलीं. असल्या मुलांना ते आपला धंदा शिकवितात, व बायकांना घरी नेतात. सुमारें पांच सहाजण थाटाचा पोषाख करतात. दोन सारख्या थैल्या तयार करून एकीत थोडेसे उडीद आणि दुसत सॉव्हरिनएवढ्या शिशाच्या चकल्या घालतात. नंतर दोघे असामा सॉव्हरिन विकणाऱ्या उदम्याकडे जातात. आणि जितक्या चकल्या असतील तितकेच सांव्हरिन विकत घेण्याचा सवदा करून, सॉव्हरिन मोजून ते उडीद असलेल्या थैलीत घालतात. आतां पैसे घ्यावयाचे इतक्यांत तिसरा इसम येऊन ह्मणतो की आधीं धन्याला विचारू या. आणि ती उडीद सॉव्हरिनची थैली उदम्यापाशी ठेवून सर्वजण जातात ते लगेच परत-