पान:गुन्हेगार जाती.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

छप्परबंद. ३५ तात व भावांत कमी करतात. मग तो उदमी ' नाहीं ' ह्मणतो. ते आपली थैली परत मागतात. ती रिचवितांना जर उदम्याला न दिसतां सॉव्ह- रिनवर उडीद पडले, तर असें समजतात कीं शिकार साधणार. आणखी दोन इसम लागलींच येऊन सांगतात कीं धनी भाव चढविण्यास कबूल आहे. तेव्हां थैलींत पुन्हां सॉव्हरिन भरतात. नंतर जणों अगदीं नवखा असा एक इसम येऊन सॉव्हरिनचा सवदा करूं लागतो. तेवढ्यांत प्रथम सवदा करणारे सॉव्हरिनची थैली घेऊन तिच्या ऐवजीं शिशाच्या चक- ल्यांची थैली तेथें ठेवून चालते होतात, आणि उदम्यास सांगतात कीं मालकाला विचारून येईपर्यंत ही येथें असू द्या. अर्थात् ते पुन्हां परत येण्याचें नांवच नको. त्यांची ठकबाजी करण्याची दुसरी युक्ति अशी आहे:- ते बाजारभावापेक्षां स्वस्त सोनें देऊं करतात. ह्या धंद्याला सुमारें २० तोळे सोनें बस्स होतें. दोन सारख्या थैल्यांपैकी एकींत खोटे रुपये भरतात. नंतर चोरीचा माल घेणाऱ्या उदम्याला गांडून ते एखाद्या आडरस्त्याच्या जागीं सवयासाठीं जातात, आणि खोटे रुपये असतील तितक्या किंमतीचा सवदा करतात. त्या उदम्यानें मोजलेले रुपये ते रिकाम्या थैलींत घालून त्याच्या हवालीं सोनें करतात. इतक्यांत एकजण तेथें अचानक येतो आणि बोभाटा करण्याची भीति घालतो. अर्थात् मग धांदल आणि धांवपळ सुरू होते, आणि त्यासरसे उदम्या- कडून सोनें परत घेऊन त्याला न कळत त्याच्या हातांत ते खोट्या रुपयांची पिशवी टाकतात. गुन्ह्याची पद्धतः - लाभाचा होरा पाहून छप्परबंद एकेक दोन दोन असे लोकांची नजर चुकवून घर सोडतात. ते बहुधा पायी चाल कधीं रेल्वेनेंही जातात. कोणाला संशय येऊं नये म्हणून जवळचें तिकीट काढतात, आणि परत येतांना गांवच्या स्टेशनापासून दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेशनावर उतरतात. त्यांचे टोळींत तीन ते दहा क्वचित् तीस- ही मनुष्यें असतात. जरी त्यांची संख्या बरीच असते, व हवें तेथें ते