पान:गुन्हेगार जाती.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

छप्परबंद. नाण्यांवरील रेघा | चिमटी ... रपटणी... पाडण्याची तीक्ष्ण कुलकुली.. कोरणी. दोंक बदलाकराले गुदद्वारात रुपया रेंद ... ३३ सांच्याची माती. ताडी. घर. रस्ता. लपव. आपण कोणत्या वाटेनें गेलों हें आपल्या साथीदारांना कळविण्या- साठीं ते वाट फुटते अशा रस्त्यांच्या पटाजवळ एक फूट लांब, सहा इंच रुंद व सहा इंच उंच असा मातीचा ढीग करितात; आणि ज्या दिशेनें ते गेले असतील त्या बाजूला त्याचे समोर एक बाण काढतात. सुमारें शंभर याचे अंतरावर ते असे तीन ढीग घालतात, कां कीं, एखादा बुजला तर बाकीचे तरी शाबूद रहातील. तसेंच रस्त्याच्या कांठावर पाऊल फरपट्न ते मातीचे ढीग घालतात. ज्या बाजूला ढीग रुंद, त्या बाजूनें ते गेले असें समजावें. कधीं कधीं गेलेल्या रस्त्याचे बाजूला धुळी- मध्यें आंकडीच्या काठीसारखी रेघ काढतात. असल्या रेघेच्या सरळ बाजूकडे ते गेले असें समजावें. जेथें दोन वाटा जातात तेथें एक उभी रेघ व तिच्यावर एक आडवी रेघ काढतात. केव्हां केव्हां ते रस्त्याच्या कडेला, झाडांच्या डहाळ्या दगडाखालीं ठेवितात, तेव्हां जिकडे देंठ असतील तिकडे ते गेले असें समजावें. रस्त्यावर दोन समोरासमोर आंक- डीसारख्या रेघा असल्या ह्मणजे जवळपास छप्परबंद आहेत असें टोळीतून फुटलेल्या लोकांना कळतें. उपजीविकेची दर्शनीं साधने:- हे लोक भिक्षा मागतात, कांहीं शेती व थोडेसे पोस्ट व फॉरेस्ट खात्यांत नौकरी करतात. बायका शेत- काम, चटया, गोधड्या करतात. वेषांतरः- ते घरून नेहमींच्या पोषाखाने निघतात, आणि संकेत- स्थानीं फकिरी पोषाख चढवितात. जवळ झोळी, चिमटा, खिस्ता (कटोरी), गळ्यांत माळा, हेल काढून खोल आवाजानें सवाल, आणि दीनवाण्या तोंडानें पुटपुट - ह्मणजे फकिराचें पुरें सोंग बनलें. पकडलें असतां ते न 3