पान:गुन्हेगार जाती.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

छप्परबंद. पोषाख व राहणी बरीच स्वच्छ असते. त्या हिंदुस्त्रियांप्रमाणे पेहराव करतात व हिंदू आणि मुसलमान ह्या दोन्ही जातींचे दागिने घालतात. सुवासिनी बायका डावे नाकांत रुप्याची नथणी घालतात. बायका पुरुषां- बरोबर फेरीला जात नाहींत, पण त्यांचेबद्दल खरी खबरही देत नाहींत. झातारे कोतारे, दुखणाईत व अजाण मुलें वगळून छप्परबंद हमेशा तीन ते दहाजणांच्या ( क्वचित् तीसजणांच्या ) टोळ्या करून मोहरमनंतर घर सोडतात; व वर्षानें परततात. गांव सोडण्यापूर्वी घरधनी आपल्या कुटुंबाची येणेंप्रमाणें बेगमी करून ठेवतो: - ( १ ) ऐपत असल्यास कित्ये- क महिन्यांची, वेळेवर वर्ष दोन वर्षांची रोख खर्ची आपले माणसांपाशीं ठेवतो. (२) गांवच्या सावकाराला किंवा पाटलाला घरच्या माणसांना खर्चावयास देण्याचें सांगून परत आल्यावर दुणी भरतो. ( ३ ) सहा किंवा आठजणांच्या टोळींत बहुधा एक श्रीमंत असतो. तो आपल्या व आपल्या गरीब साथीदारांच्या कुटुंबांची बेगमी करतो. हें कर्ज फिटेपर्यंत आश्रित छप्परबंद आपली सर्व कमाई त्याला देतात. छप्परबंद फेरी संपवून घरीं आले ह्मणजे खाण्यापिण्याची खूप दंगल व ख्यालबाजी चालते. ते गांवचे पिराला बकऱ्याची कंदुरी करतात व आपल्यावर पांघ- रूण घालणाऱ्या गांवकामगारांना पानसुपारी देतात. असें ह्मणतात कीं, गांव कामगारांना दर घरीं वर्षासन मिळतें. अक्कलकोट संस्थानांत बोरी नदीचे कांठीं दुधणी गांवाजवळ शिंदशाहमदारची कबर आहे. त्याचे मुजावराला फकिरांचा गुरु ह्मणतात. छप्परबंद त्याला फार मान देतात, व त्याचे दर्शनाला जातात. फकिराच्या वेषानें छप्परबंद सोईप्रमाणें पायीं अगर रेल्वेने प्रवास करतात. गांवाबाहेर विहिरी, नदी किंवा तळ्या- जवळ, अथवा बागेत, अगर कोणी जात नाहीं अशा दर्ग्यात किंवा फर्कि- राच्या मकानांत ते उतरतात. एखाद्या मुसलमानानें बोलाविलें तरी त्याच्या घरांत बिन्हाड टेंकीत नाहींत. आपले जातींत जरी ते उघडपणें मद्य- मांस सेवन करितात तरी मुशाफरींत सात्विक फकिराचा आव घालून ते भिक्षेवर गुजराण करतात.