पान:गुन्हेगार जाती.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० मुन्हेगार जाती. छेगुंडे. बारागुंडे लग्नापूर्वी नवरीचे बापाला बारा होन देतात, छेगुंडे सहा देतात. दोन्ही जातींचा रोटीव्यवहार आहे, पण बेटीव्यवहार नाहीं. संयुक्त प्रांतांतल्या मुजफरनगर जिल्ह्यांत रेंड किंवा बलुची नांवाची जात आहे. ते लोकही छप्परबंदाप्रमाणें आपल्या नांवापुढें ' शाह ' लाबीतात, वर्षानुवर्षे देशांतर करतात, व खोट्या नाण्याचा धंदा करितात. पण ही जात अगदीं निराळी आहे. वस्तिः- गुन्हेगार छप्परबंद शेख आहेत, आणि ते विजापूर जिल्ह्यांत बागेवाडी व मुद्देबिहाळ तालुक्यांत रहातात. गुन्ह्याचें क्षेत्र:- ते हिंदुस्थानभर व सिलोनांतही फेऱ्या करितात. लोकसंख्याः-छप्परबंद सुमारें अडीच हजार आहेत.त्यांच्या वस्तीचीं गांवें खाली दिली आहेत. बागेवाडी तालुका:- अब्बीहल, अकुलवाडी, अगसबल, अबलनूर, अंगडगेरी, अरेशंकर, बलोटी, बसवंतपूरहट्टी, ब्यल्यल, बीडनल, ब्यकोड, चिरलडिनी, गनी, गोनल, गुडडिन्नी, हलीहाल, हांचीनल, हानगर्गी, हेब्बल, निडगुंडी, हिप्परगी, इवंगी, जायवडगी, जिरलभानवी, कानाल, कंकाल, करीबंटनल, कौलगी, किरसाल, कोडगानूर, मजरे जैनापूर, मन्नूर, मसूती, मुड्डापूर, मुकरटीहल, नागूर, नागवाड, नरसंगी, ओनीभा- नवी, राजनाल, संकनाल, सिकलवाडी, सलवडगी, तेलगी. मुद्देबिहाळ तालुक्यांत अलकोपर, बलबट्टी, बलवट, बुडीहाल, गुड- डीनी, गुंडकरजगी, हंडेर्गल, ुल्लूर, कालगी, कंडगनूर, कसीनकुंटी, कोप्प, मसूटी, पडिकनूर, रूडगी, सिदापूर, तारनाळ, वडवडगी, येरझरी. स्वरूपः - छप्परबंद गरीब मुसलमानाप्रमाणे दिसतात, ते सडपातळ, रंगदार व खंबीर चालणारे असतात. ते दाढी करीत नाहींत; त्यांची दाढी भरदार व मऊ नसते आणि तिचे केंस मागें पुढें आलेले असतात. पुरुषांचा पोषाख, पेहरण, धोतर व पोकळ पागोटें हीं होत. बायकांचा