पान:गुन्हेगार जाती.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना.

 ग्याझेटीअर्स, पोलिसखात्याचें दतर, अनुभवशीर पोलिसअंमल- दारांची टिपणें, आणि जातीजातींचे भेदे इत्यादि द्वारांनी माहिती मिळवून मेहेरबान एम्. केनडीसाहेब बहादूर इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस, इलाखा मुंबई, ह्यांनी गुन्हेगार जातींविषयी इंग्रजीत पुस्तक रचिलें. पोलिसांतील व गुन्ह्यांचे कामाशी संबंध असणाऱ्या इतर खात्यां- तील ज्या लोकांस इंग्रजी येत नाहीं, त्यांस हा विषय समजणे इष्ट आहे. त्यांचे उपयोगासाठीं सदरहु पुस्तकाचें हें मराठी रूपांतर केलें आहे. सदरच्या अंमलदारांस गुन्हेगार जातींची रहारीत, त्यांची गुन्हे करण्याची पद्धत वगैरे माहीत असणें अवश्य आहे. त्याशिवाय इतर लोकांसही सामाजिक सुधारक, शेतकरी व निकृष्ट जातींचे उ- द्धारासाठी प्रयत्न करणारे परोपकारी गृहस्थ-यांना प्रस्तुत पुस्तकापासून पुष्कळ उपयुक्त माहिती मिळण्याचा संभव आहे
 मेहेरबान सी. सी. बॉईडसाहेब बहादूर, आय सी. एस., डि स्टिक्ट जज्ज, अहमदनगर व मेहेरबान एम्. केन सिाहेब बहादूर इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस, मुंबई इलाखा, यांचे शिफारशीवरून नामदार मुंबईसरकारनी मला हे पुस्तक प्रसिद्ध करण्याची परवानगी दिली, ह्याबद्दल मी उभयतां साहेबांचे व नामदार सरकारचे मनःपूर्वक आभार मानतों. मेहेरबान केनडीसाहेबांचे उपकारांचा भार तर मज- वर फारच मोठा झाला आहे. मूळ पुस्तकाचें श्रेय त्यांना आहेच