पान:गुन्हेगार जाती.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

छप्परबंद. २९ गुन्ह्याची उपकरणें:- गुन्हा करण्यास निघाले म्हणजे खानदेश, दक्षिणचे भिल्लांजवळ धनुष्यबाण, हातोडे, काठ्या, गोफणी(गलूल), तल- वारी (खऱ्या, नकली), भाले, बंदुका असतात. पंचमहाल, रेवाकांट्या- मधील भिल्ल धनुष्यबाण घेऊन बाहेर पडतात. बालाभ्यासामुळे त्यांना निशाण चांगलें मारतां येतें. रस्तालूट वगैरे गुन्हे करणाऱ्या टोळीजवळ ढाल, तलवार, बंदूक, काठ्या असतात. पहार किंवा कनथोडा ( मोठा लोखंडी खिळा ) हीं खानदेशी व दक्षिणी भिल्लांची घरफोडीचीं हत्यारें होत. पालनपुरचे भिल्ल खातरीया (मोठी आंकडी) चा उपयोग करतात.. चोरीचे मालाची निर्गतिः- भिलांमध्यें जें ज्याला सांपडेल तें तो ठेवितो. पण बहुधा नाइकाला दोन वांटे मिळतात. चोरीचा माल आधीं पुरून ठेवितात, किंवा दडवून ठेवितात, आणि मग गुजर, रजपूत, ठाकूर, गांव कामगार यांना विकतात. खिसा गरम असला म्हणजे भिल्लांचा हात फार ढिला असतो. बाजरीच्या एका भाकरीला रुपया, दारूच्या तीन बाटल्यांना पंधरा रुपयांचें कडें भिलांनीं दिल्याचे दाखले मिळतात. चो- रीचा माल उकिरड्यांत, वळ्हयींत किंवा माळ्यांत ते लपवून ठेवितात. भिल्लांच्या घराचा झाडा घेतांना उतरंडी, जातीं, चुलीखालची जागा यां- कडे विशेष लक्ष्य द्यावें. एखाद्या वेळेला चोरीचे दागिने ते टोळींतल्या बायकांना घालावयास देतात. चोरलेली जनावरें ते लांबच्या बाजारांत त्रिकतात, किंवा स्नेह्यांना अगर नातलगांना देतात आणि ते त्यांचीं शिंगें कापून व त्यांना डागून त्यांचें रूप पालटतात.' छप्परबंद. संज्ञा :- ह्यांना नाणी पाडणारे फकीर ह्मणतात. आपापसांत ते आपल्याला भदू ह्मणतात, आणि उत्तरेकडे त्यांना खुलसूर्ये (खोटी नाणीं करणारा) ह्मणतात. त्यांच्यांत दोन पोटजाती आहेत, बारागुंडे आणि