पान:गुन्हेगार जाती.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ गुन्हेगार जाती. असते. त्यामुळे ते बहुधा हातीं लागत नाहींत. त्यांचा पत्ता त्यांच्या जातीतल्या बातमीदारांकडून लागतो. ज्या आप्ताच्या घरीं ते नेहमीं जातात, त्यावर किंवा दारूदुकानावरही पाळथ ठेवून त्यांचा पत्ता लागतो. आश्रय देणारे लोक त्यांना दारू पोंचवितात, किंवा ती आणण्याला त्यांच्या बायका येतात. लग्नाच्या जेवणावळींत फरारी भिल्ल बहुधा हजर असावयाचा. भिल्लिणी फरारी भिल्लावर इतक्या आषक होतात कीं नवरा सोडून त्याचे मागे जातात. ह्मणून जंगलांत जाणाऱ्या येणाऱ्या तरुण भिल्लिणींवरही नजर ठेवावी. त्या टोळीच्या हेरांचें कामं अगदीं बित्तं करतात. गुन्ह्यांच्या कामी भिल्ल इतर जातीचे लोक सामील करतात, आणि तेही दुसऱ्या जातीच्या गुन्हे करणारांला जाऊन मिळतात. ते बहुधा एका रस्त्यावर दोन तीन घरांवर दरोडा घालतात. गुन्हा करतांना ते हिंदुस्थानी बोलतात, व एकमेकांना फौजदार, जमादार ह्मणतात. ते बगली पद्धतीनें चौकटीजवळ भोंक पाडून, किंवा रुमाली पद्धतीनें भिंती धावें पाडून घरफोडी करतात, आणि जें हातीं लागेल तें नेतात. ते पेट्या उचलून नेतात व नंतर शोधतात. गुजराथेंतले भिल्ल दहा ते वीसजण मिळून रस्तालूट करतात. त्यांच्या- जवळ तीरकमटे, ढाली, तलवारी, काठ्या आणि कधीं कधीं बंदुकाही असतात. ते दारू झोंकून गुन्ह्याला निघतात. टोळीपैकीं एकदोघे झाडावर बसतात, आणि बाकीचे झाडींत दडतात. झाडावरच्या हेरांनी इशारत दिली ह्मणजे ते बाहेर पडतात व पहिल्यानें धोंडे फेंकतात, आणि मग गाड्यांवर व वाटसरांवर येऊन पडतात. ते बैल सोडून देऊन गाड्या लुटतात, व आंतल्या लोकांस मारहाण करून त्यांच्याजवळ असेल नसेल त्याची झडती घेतात आणि तें व बैलही घेऊन निघून जातात. ते गुरखी पोरांना पकडून त्यांचे डोळे बांधतात किंवा कधीं कधीं त्यांचे हातपाय बांधतात, आणि त्यांचीं गुरें हांकून नेतात. दुपारीं अगर तिसरे प्रहरी गुरे पाण्यावर नेण्यासाठी गोळा करतात त्या वेळीं ते हें काम करतात. गुजराथी भिल्ल बहुधा कत्र्या घरांत चोरी किंवा घरफोडी करतात.