पान:गुन्हेगार जाती.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भिल. २७ गुन्ह्याची पद्धतिः- जें घर फोडावयाचें तें कोठें आहे, त्याच्या आस- पास काय काय आहे, त्यांत माल किती मिळेल, अडथळा किती वगैरेसंबंधानें माहिती भिल्ल लोक गुन्हा करण्यापूर्वी मिळवितात. आपला माग लागूं नये ह्मणून गुन्हा करून परत येतांना ते टोळी फोडून निर- निराळ्या रस्त्यांनीं सखल जमिनीवरून जाऊन संकेतस्थानीं ( चोरीच्या ठिकाणापासून संकेतस्थान एक मैलावर असतें) गोळा होतात. बंडखोर भिल्ल माग न लागू देण्याची इतकी पर्वा करीत नाहींत. बंडखोरांची टोळी मोठी असल्यामुळे ती कोणाच्या न कोणाच्या तरी दृष्टीस पडाव - याची, व ती जातांना रस्त्यावर कांहीं तरी सामान पडावयाचें. जरब देणें आणि जबरदस्तीनें अडथळा मोडणें हीं भिल्लांच्या गुन्ह्याचीं मुख्य चिन्हें होत. दुष्काळामुळें खाण्याची तुटार, सूड, देणें नसतां पैशाचा तगादा, अशा प्रकारच्या कारणांसाठीं भिल्लांनी सावकारांच्या घरांवर मोठमोठे दरोडे घालून, रोखे फाडून, सावकारांना व त्यांच्या माणसांना पुष्कळदां बेदम ठोकल्याची उदाहरणें आहेत. क्वचित् प्रसंगीं त्यांनीं जीवही घेतले आहेत. त्यांचे नाईक वजनदार गुजर, रजपूत, रोहिले, पाटील व कलाल यांच्याशीं वळण बांधतात. आसपासच्या गांवांतील लुटण्याजोग्या घरासंबंधानें हे लोक त्यांना बातमी देतात, इतकेंच नव्हे तर खार्णेपिणें, आडोसा वगैरे हरतऱ्हेची मदतही देतात. ज्या गांवांत त्यांचे स्नेही असतात, तेथून पांच सहा मैल लांब अशा एखाद्या टेंकडविर . भिल्लांची टोळी तळ देते. स्वयंपाक करण्यासाठीं त्यांच्याबरोबर त्यांच्या बायका अथवा रखेल्या औरता असतात. एखाद्या अडचणीच्या ठिकाणीं येऊन पडले ह्मणजे ते फार सावध राहतात, आणि जलद जलद तळ बदलतात. खाण्याची भ्रांति पडली ह्मणजे त्यांना छपून राहणें मुष्किलीचें होतें, आणि मग ते तेव्हांच सांपडतात. भिल्लांना चांगलें निशाण मारतां येत नाहीं, ह्मणून ते सामना न देतां हत्यारें टाकून पळ काढतात. त्यांजवर हल्ला केला असतां ते मोठ्या धैर्यानें तोंड देतात. ते चपळ व कंटक असतात, आणि जंगलचे रस्ते व टेंकड्या यांची त्यांना पुरी माहिती