पान:गुन्हेगार जाती.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ गुन्हेगार जाती. उपजीविकेची दर्शनीं साधनें:- डिंक, मध, गवत, काथ, मोहाचीं फुलें विकणें, झाडांची तोड करून कोळसे पाडणें, आणि नागली, वरी- सारखीं धान्यें व इतर शेतकामें यांवर जंगली भिल्ल आपली उपजीविका करतात. सपाटीवरचे भिल्ल शेती व शेतकाम, जागलकी, सुतारकी, लोहारकी करतात. कांहींजण पोलीस, फॉरेस्ट, रेल्वे, गिरण्या यांमध्यें नोकरी पतकरतात. कांहीं थोडे गाड्या हांकतात व टोपल्या विणतात. शिकार करण्यांत व शिकारीचा माग काढण्याचे कामांत भिल्लांचा हात धरणारी दुसरी कोणतीही जात नाहीं. वेषांतर:- गुन्हे करावयास निघाले ह्मणजे भिल्ल फॉरेस्ट अथवा पोलि- सचे शिपायाप्रमाणें खाकी किंवा काळे डगले घालतात. मोठ्या गुन्ह्याचे वेळीं ते धाटे बांधतात, व राख किंवा माती तोंडाला फांसतात. कित्येक वेळां भिल्लिणी पुरुषाचे वेषांत फरारी भिल्लांबरोबर हिंडतात. गुन्हे :- दुष्काळ पडला, सावकारांनीं निकड लाविली आणि एखादा नाईक पुढे सरसावला ह्मणजे ते बंड करून दूरवर लूटमार करतात, एरव्हीं ते लहानसान चोऱ्या करतात. आपसांतल्या आकसामुळें किंवा चेटकाचे संशयामुळें ते क्वचित् खूनही करतात. भिल्लांमध्यें खोटील आणि तडवी अट्टल गुन्हेगार असतात. बहुतेक फरारी याच जातींतले निघाले. भिल्ल लोकांचे मुख्य गुन्हे झटले ह्मणजे बाजारकऱ्यांवर दरोडे घालणें आणि रस्तालूट हे होत. सपाटीवर राहणारे भिल्ल व धानके घरफोडी व चोऱ्या करतात, आणि दुष्काळांत रेल्वेच्या मालगाड्या लुटतात. तडवी भिल्ल घरफोड्या व पिकांची चोरी करतात. खानदेशांतले भिल्ल दरोडे घालतात आणि चोरीचा माल सामलतींतल्या रोहिले, पठाणांना विकतात. माचवी चोरून दारू गाळतात आणि चेटकी ह्मणून एखाद्या बाईचा खून करतात. अहमदनगरकडील भिल्ल दरोडे, घरफोड्या, रस्तालूट व चोऱ्या करतात. आणि प्रसंगविशेषीं बंडही करतात. गुजराथेंतले भिल्ल दरोडे, घरफोड्या व चोऱ्या करतात, आणि पिकें व जनावरें ह्यांच्याही चोऱ्या करतात.