पान:गुन्हेगार जाती.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भिल. २५ मुळाशी हाच विश्वास असतो. ते गलिच्छ दिसतात व राहतात. त्यांच्या जातीचा आळा इतका पक्का असतो कीं एकमेकांविरुद्ध बातमी देऊन ते घरमेद सहसा करीत नाहींत. त्यांना मासे धरण्याचा व शिकारीचा नाद असतो. त्यांना अब्रु झांकावयापुरतें वस्त्रप्रावर्ण असतें. त्यांचा वर्ण काळा, नाक बसकें, आणि तोंडवळा वाटोळा व उथळ असतो. ते कंटक, चपळ, कसलेले, मध्यम उंचीचे व श्रमसहिष्णु असून त्यांची नजर तीक्ष्ण असते. गुन्ह्याचे कामी त्यांना बायकांची मदत असते. गुडघ्या- पर्यंत धोतर अगर लंगोटी, अंगांत बंडी किंवा चवाळें हा पुरुषांचा पोषाख होय. गुजराथेंत त्यांच्या डोक्याला टोपी किंवा अपरा फेटा असतो, व मनगटावर डागल्याचे वण असतात. भिल्लिणी दक्षिणेत लुगडें- चोळी नेसतात, आणि गळ्यांत शिंपा व पोत यांचीं तंग पेंडी घालतात. खानदेशांत कोठें कोठें त्या गुडघ्यापासून घोट्यापर्यंत पितळेचे वाळे घाल- तात. गुजराथेंतल्या भिल्लिणी साडी, बंडी व काचोळी नेसतात. त्या साडी डोक्यावरून घेतात, त्यामुळे पोटऱ्या उघड्या राहतात. बोर, राखडी हे त्यांचे दागिने होत. त्या कानामध्यें धातूच्या किंवा लांक- डाच्या बाळ्या व वेल घालतात, नाकांत नथा घालतात. गळ्यांत कांच, शिंपा किंवा फत्तर वगैरेंच्या मण्यांच्या गळसऱ्या घालतात, हातभर गोठ व पायभर वाळे घालतात, आणि हातांवर पुष्कळसे व छाती-तोंडावर थोडेसें गोंधतात. खानदेशांतले भिल हातावर व भिंवयांच्या मधोमध गोंधतात. भिलांचें खानदेशांत मुख्य दैवत वाघदेव आणि गुजराथेंत देवी होय. " बाराबीज " च्या शपथेला गुजराथी भिल फार मानतात. भाषाः - भिलोरी भाषा हिंदुस्थानी, मराठी आणि गुजराथी यांपासून निघाली आहे. गुजराथ-काठेवाडांतले कांहीं भिल मारवाडी बोलतात. सांकेतिक भाषा :- ते आपला हेतु अंगविक्षेपानें एकमेकांना कळ- वितात. खानदेशांत दरोड्याला ' वाटपाडी' पंचमहालमध्ये पोलिसला 'कागडा' अगर ' तरकडू ' तिरकामट्याला ' हरिओ कामटो' ह्मणतात.