पान:गुन्हेगार जाती.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भिल. संज्ञा :- खानदेश आणि दक्षिणेंत रहाणारे भिलांचे तीन वर्ग पडतील. सपाटीवरचे, डोंगरी व जंगली, आणि मिश्र जातीचे भिल. सपाटीवरच्या भिलांना खानदेशांत खोटिल ह्मणतात. डोंगरी व जंगली भिलांच्या येणें- प्रमाणें जाती आहेत:-नहाल, पावरे, बर्डे, धानके, धोरेपी, मठवाडी किंवा पनारी, मावची, वार्ली आणि डांगची. मिश्र जातीच्या भिलांच्या येणें- प्रमाणें जाती आहेतः- भिलाले (भिल व रजपूत यांचें मिश्रण ) आणि तडवी किंवा निर्दी ( मुसलमान भिल ). रेवाकांठा, महीकांठा, मोडासा, झालोड येथे वागडिये भिल आहेत. वस्तिः- ह्यांचा भरणा मध्य हिंदुस्थान, राजपुताना, गुजराथ आणि खानदेश येथें आहे. उत्तरेस ते संयुक्त प्रांतांत आढळतात, आणि दक्षि- णेंत ते अहमदनगर, नाशिक व तुरळक पुणे जिल्ह्यांत सांपडतात. काठे- वाड, कच्छ व सिंधमध्यें थर, पारकर येथें त्यांची वस्ति आहे. भिल- वाड्याला भिल्हाटी ह्मणतात. गुन्ह्याचें क्षेत्र:- ही जात फिरस्ती नाहीं. ते भले घरकोंबडे आहेत. ते आपले तालुक्यांत किंवा त्याचे आजूबाजूला गुन्हे करतात. पण 'जेव्हां ते व्यक्तिशः किंवा टोळी जमून बंड करतात तेव्हां ते मुलुखभर धुमाकूळ माजवितात, आणि लांबवर गुन्हे करतात किंवा पळ काढतात. लोकसंख्या:- भिल सुमारें पावणेसहा लक्ष आहेत. व्यभिचारी, बेफिकीर, स्वरूपः- सामान्यतः भिल आळशी, दारूबाज, डौली, उधळे, भोळे, सच्चे आणि आनंदी असतात. त्यांचा चेटकावर इतका विश्वास असतो कीं, कोणत्याही प्रकारचें संकट ओढवलें तरी, त्यांची धांव चेटकाकडे. त्यांच्या आपसांतल्या लठ्ठालठ्ठीच्या गुन्ह्याचे