पान:गुन्हेगार जाती.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रजपूत भामटे. २३ उपजीविकेची बाह्य साधनें :- पुष्कळ रजपूत भामट्यांना जमीन असते. पण ते ती खंडानें लावितात. पुरुष बहुधा गांवीं नसतात. बायका घरी शेतकाम करतात. वेषांतरः- रजपूत भामटे यात्रेला जातात तेव्हां ते साधूंचा किंवा बै- राग्यांचा वेष घेतात,आणि आपल्या नांवापुढें दास किंवा सिंग लावितात. रेल्वेवर चोरी करतात तेव्हां ते मारवाडी किंवा ब्राह्मणांप्रमाणे पोषाख करतात. मुलूखगिरीला निघाले ह्मणजे ते गांवाबाहेर मैदानांत राहतात. त्यांना पालें नसतात. गुन्हे:- ते बहुशा दिवसां आगगाडींत, यात्रेत किंवा गर्दीत चोरी कर तात. रात्री चोरी करणारांना त्यांच्यांत जातीबाहेर टाकतात. गुन्ह्याची पद्धतिः- त्यांच्या टोळींत तिघेजण असतात. ज्याची चोरी करावयाची त्याचें लक्ष एकजण वेधतो, दुसरा चोरी करतो, आणि तिसरा ऐवज घेऊन धूम ठोकतो. मुलाच्या अंगावरचें जवाहीर काढण्यांत आणि खिसे कातरण्यांत त्यांचा हात खंडा आहे. नदीकाठावर हिंडून ते स्नान करणारांचे कपडे चोरतात. खर्ची उडाली झणजे ते एखाद्याचे घरीं नौकरी पतकरतात, आणि तेथें स्वतः चोरी करून पळून जातात; किंवा साधूच्या वेषानें खेपा घालणाऱ्या आपल्या जोडीदाराचे हवालीं आपल्या मालकाच्या जिनसा करतात. चोरी करतांना ते तोंडावरून धोतर घोंग- टून घेतात. गुन्ह्याची हत्यारें:- त्यांचेजवळ चाकू, कातरी, कांचेचा तुकडा आणि वेष पालटण्याचें सामान असतें. चोरीचे मालाची निर्गतिः- बोभाटा मिटेपर्यंत ते चोरीचा माल तळाच्या आसपास पुरून ठेवितात आणि टोळीच्या पुढें तो रवाना करतात. जवाहीर होईल तितकें लवकर ते विकतात. चोरलेला माल ते अगदीं थोड्या किंमतीला विकून पैसे मनऑर्डरीनें घरीं पाठवितात. भारी किम- तीचा माल ते पार्सलानें घरीं पाठवितात.