पान:गुन्हेगार जाती.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ गुन्हेगार जाती. गांवें अहमदनगर जिल्ह्यांत जामखेड तालुक्यांत खर्डे व त्याच्या वाड्या दरडवाडी, गिटेवाडी, पंढरीची वाडी आणि बळगव्हाणची खंडवाडी; सोलापूर जिल्ह्यांत सांगोलें तालुक्यांत सोनंद, परे, हिंगर्गी व नरळ. गुन्ह्याचें क्षेत्र:- हे लोक सर्व हिंदुस्थानभर व विशेषत: मद्रास इला- ख्यांत फिरतात, आणि बायकांसह कार्तिकस्वामी, हंपी, गोकर्णमहा- बळेश्वरच्या यात्रांना गुन्ह्यासाठीं जातात. लोकसंख्याः– अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांत त्यांचे सुमारें दोनशें लोक आहेत. व स्वरूप :- बहुतेक निमगोरे किंवा फिक्कट व कांहीं थोडे काळे अस- तात, त्यांचा पोषाख मराठ्यासारखा असून ते जानवीं घालतात, कानांत कुंडलें घालतात. बायका नाक टोंचीत नाहींत, व डोळ्यापाशीं गोंधीत नाहींत. कुमारिका तांबड्या पोतीच्या एका सरामध्ये सोन्याचा एक मणी घालतात. सुवासिनी स्त्रिया काळ्या पोतीचे दोन सर आणि मध्ये एक सोन्याची ताली गळ्यांत घालतात. त्या ब्राह्मणासारखें लुगडें नेसतात, पण पुढच्या निऱ्या मोकळ्या सोडतात. रजपूत भामटे बड़े दारूबाज व अफूबाज असतात; आणि गुंगले ह्मणजे खूप बकतात. भाषा:- आपसांत ते हिंदुस्थानी बोलतात. ते मराठी, कानडी व तेलगु न अडखळतां बोलतात, आणि 'च'चा उच्चार ' च्य ' करतात. सांकेतिक शब्द. थालीय पोंदड फौजदार. डोकरी म्हातारी बायको. पोलीस. छावा ... मूल. कपप्या चरकलीन कुकड बटमल ... पाटील. घभा ... कुळकर्णी. घबेकू च ... ... ... जागल्या. मराठा. म्हातारा पुरुष. पोंदड ऐछे धोती उधय ... ... घर. पोलीस आले. टोळीचें काम सुरू . झालें.