पान:गुन्हेगार जाती.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रजपूत भामटे. २१ चोरीच्या मालाची निर्गतिः- चोरी करून भामटे परत आले ह्मणजे ते जातीच्या पाटलाला (थलमड ) रुपयांत दोन आणे देतात. त्यांतून तो गांव कामगारांची तोंडदावी करतो. चोरीचा माल ते बहुधा आपल्या तळाजवळ पुरून ठेवितात, आणि त्याचा बोभाटा ऐकू येईनासा झाला ह्मणजे तो आंखबंद किंवा थोडा थोडा, संभावित दिसणारे सोनार, मारवाडी, कलाल, ह्यांना विकतात. या प्रांतांतला माल त्या प्रांतांत ते लख्ख उघड रीतीनें विकतात. कधीं कधीं चोरीच्या मालाचें पार्सल ते आपल्या नातलगाकडे घरीं पाठवितात. पण बहुधा त्याचे टक्के करून मनिऑर्डरी करतात. मनिआर्डरी व पार्सलें पूर्वसंकेताप्रमाणें खोट्या नांवावर असतात. कित्येक वेळां तीं पाटलाच्या किंवा सावकाराच्या नावांनीं असतात. लहान लहान दागिने अंगावर लपविण्यांत भामटे व त्यांच्या बायका फार हुशार असतात. लहान नाणीं कधीं कधीं त्यांच्या घशांत सांपडतात; कधीं कधीं ते तीं गिळून टाकतात. त्यांच्या घरां- तल्या तुळया व जोडभिंतीमधल्या जागेंतही माल सांपडला आहे. सबब त्यांच्या बिऱ्हाडाचे कोनेकोंपरे हुडकले पाहिजेत, आणि संशयास्पद जमिनी भिंती खांदल्या पाहिजेत. भामट्यांच्या वस्तीच्या गांवकामगारांची त्यांच्यांशीं पाती असते असें अनुमान करण्यास हरकत नाहीं. रजपूत भामटे. संज्ञा:- ह्यांना परदेशी भामटे ह्मणतात. भोपाळ आणि बुंदेल- खंडांतील ' सोनोरिया ' जातीच्या दिवसां चोरी करणाऱ्या भामट्यांचे हे वंशज आहेत. निजामशाहींतल्या एदलाबादचे जोवारी भामटे आणि हे एकच असावेत. वस्ति: - जतसंस्थान, सोलापूर व अहमदनगर जिल्हे आणि निजाम- शाहींत उस्मानाबाद जिल्हा येथे हे लोक आढळतात. त्यांच्या वस्तीचीं