पान:गुन्हेगार जाती.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० गुन्हेगार जाती. साधलें नाहीं तर हेरलेल्या उतारूमार्गे ते धर्मशाळेत जाऊन संधि साधून चोरी करतात. ते रात्रीं दुसऱ्या किंवा पहिल्या वर्गाच्या डब्यांतून थैल्या लांबवितात. सन १८९८ सालीं नामदार गव्हर्नरसाहेबांच्या डब्यांत भामट्यांनी चोरी केली, आणि कित्येक महिनेपर्यंत चोरीचा पत्ता ला- गला नाहीं. भामटे उलट बाजूनें किंवा चालत्या गाडीतून उतरतात. गाडी चालू असतां ते पहिल्या व दुसऱ्या वर्गाच्या डब्यांत पायफळीवरून चालत जाऊन चोरी करतात. गांवाबाहेर ओसाड ठिकाणीं ते चोरीचा माल घेणाराला घुलावून नेतात, आणि खरे दागिने दाखवून किंमत ठरवितात. पुढें पैसे मोजणें चाललें असतां त्यांतलाच एकजण पोलिसचें सोंग करून तेथें येतोसा दिसतो. तेव्हां धांदल उडून माल घेणाराच्या पदरांत खोटे दागिने ते टाकतात, आणि सर्वजण बाल्या हांकतात. कधीं कधीं माल घेणाराला कांहीं एक न देतां त्यापासून जबरीनें ते पैसे उपटतात. भामट्यांच्या तळाचा झाडा घेण्यासाठीं पोलिसानें पुरेसे लोक बरोबर न्यावेत. कारण भाम- ट्यांचे लोक जास्त असले तर ते स्त्रीपुरुष मिळून पोलिसांवर हल्ला करून त्यांना पिटाळून लावितात. गुन्ह्यांचीं उपकरणें:- उलथणें, पळी आणि मोठी अणीदार सुरी ह्यांनीं ते घरफोडी करतात. आंकडा, कोरणें, अडकित्ता व किंकरे ह्यांनीं ते कुलुपें तोडतात व पेट्या फोडतात. उल्मुख किंवा वाघनख नांवाचा कोयत्यासारखा लहान चाकू पुरुष नेहमीं वरचा ओंठ आणि दाढ ह्यां- च्यामध्यें किंवा घशांत आणि बायका बुचड्यांत किंवा चोळीच्या खिशांत ठेवतात. साधे चाकू ते तपकिरीच्या किंवा चुन्याच्या डबींत ठेवितात.. वाघनख, साधे चाकू, कातरी व भिंग ह्यांनीं ते खिसे, पोतीं व थैल्या फाडतात. किल्ल्यांचा जुडगा, सुईदोरा, छत्री, वेष पालटण्याचें सामान भरलेलें एक, उचललेल्या पाकिटाबद्दल ठेवण्यासाठीं रद्दी सामानानें भर- लेलें दुसरें पाकीट वगैरे जिनसा त्यांच्याजवळ असतात. स्टेशनांचीं नांवें मराठीत टिपलेलीं असा एक नकाशा एका भामट्याजवळ सांपडला.