पान:गुन्हेगार जाती.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भामटे. १९ सराफाच्या दुकान टाकून तिच्या ऐवजीं सराफाची रुपयांची थैली हात-: चलाखीनें भामटे उपटतात. रेल्वेवर ते बहुधा दोघे तिघे मिळून वेटिंग - रूम अगर तिसऱ्या वर्गाच्या डब्यांत चोऱ्या करतात. पोतें किंवा कापडी पाकीट बरोबर घेऊन पोलीसच्या हातीं न लागावें ह्मणून ते जवळचें अगर लांबचें तिकिट काढतात. ज्या उतारूंच्या पाकिटांत मौल्यवान् जिनसा असण्याचा संभव दिसतो त्यांच्या डब्यांत ते बसतात, व ते कोठें जाणार वगैरे विचारून घेतात. डब्यांतले लोक लवंडले ह्मणजे एकजण मोठें पांघरूण घेऊन बांकाखालीं निजतो. दुसरा समोरच्या बांकावर पाय ताणून वर मोठें पांघरूण घेतो, तें असें कीं, खालचा माणूसही झांकला जातो. सर्व सामसूम झालें ह्मणजे खालचा इसम अगोदर टेहाळलेलें पोतें अगर पाकीट चापसतो. त्यांत हात न गेला तर तोंडांतला वांकडा लहान चाकू (वाघनख) काढून त्यानें तें पुरतें उसवितो, आणि त्यांतला माल. काढून घेऊन वेळ सांपडल्यास तें पुनः शिवून टाकतो. किंवा असें न. करतां, आपलें पोतें अगर पाकीट ठेवून रोखलेलें पोतें अगर पाकीट उच्च- लतो. चोरलेला माल आपल्या सोबत्याजवळ देऊन दोघेजण पुढच्या स्टेशनावर उतरतात, किंवा दुसऱ्या डब्यांत जातात. चोरीचा बोभाटा झाल्यास खिडकीवाटे माल टाकून देऊन पुनः त्या ठिकाणी येऊन ते तो घेऊन जातात. एखाद्या वेळेला गर्दीत उतारूंचे खिसे ते कातरतात. ए- खाया उतारूनें बांकावर आपलें पाकीट ठेविलें तर त्याच्या पलीकडे भामटे. बसून झोंपेचें सोंग आणून हातानें त्या पाकिटाची व्यवस्था लावतात. शेजारचा उतारू पेंगूं लागला तर भामटे चटकन् त्याला निजावयाला. जागा देऊन, त्याचें सामान बांकाखालीं असेल तेथें - आपण निजून, त्या- "जवर उपकाराचें ओझें लादून आपले काम साधतात. निसटण्यापूर्वी पकडलें तर भामटे वर्दळीवर येऊन निरपराधीपणाचा आव आणतात, आणि आपली सुटका करून घेतात. स्टेशन पोलीस वरिष्ठाकडे तार क- रण्यांत गुंतलेलें पाहून ते गुंगारा द्यावयाला कमी करीत नाहींत. गाडीत