पान:गुन्हेगार जाती.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ गुन्हेगार जाती. , कडून मिळवितात. पुढे त्या गृहस्थांकडे जाऊन त्यांना त्या गोष्टी सांगि- 'तल्या म्हणजे ज्योतिष्यावर त्यांचा विश्वास बसतो. मग मूल होण्यासाठीं किंवा दुसऱ्या एखाद्या इष्ट सिद्धीसाठीं कांहीं साधन करावयास सांगतात. साधन करण्यासाठीं बायका त्यांना दागदागिने देतात. ह्या वेषामुळे त्यांना घरें धुंडाळून चीजवस्त कोठें ठेविली आहे तें पाहण्याचीही संधि मिळून सवडीप्रमाणें चोऱ्या करतां येतात. घरून आठ किंवा दहा भामटे निघतात आणि एखाया मध्य ठिकाणाहून लहान लहान टोळ्या करून चोऱ्या करतात. ते आपणांला मराठे ह्मणवितात आणि आपल्या किंवा आपल्या सोबत्यांच्या नांवागांवांचा थांग लागू देत नाहींत. यात्रा, धर्मशाळा, स्टेशन, वगैरे गर्दीच्या ठिकाणी त्यांच्या टोळींत दोन ते चार असामी व एक मुलगा असतो. इशारती करणें, खुद्द उचल्यावरून इतरांचें लक्ष उडविणें वगैरे कामी त्या पोराचा उपयोग होतो. एकजण दागिना काढून घेतो, किंवा खिसा कातरतो अगर गर्दीत एखाया इसमाला रेंटून त्याचा जिन्नस हिसकतो. त्याचे साथीदार बायका व पुरुष जवळपास असतात, ते तो जिन्नस हातोहाती लांबवितात. मग उचल्या सांपडला तरी त्याच्याजवळ कांहीं नसतें आणि तोच उलट शिव्या शाप देऊन कांगावा करतो, उशाला गांठोडें घेऊन एखादा इसम निजला ह्मणजे भामटा त्याच्या पायाला कांहीं टोंचतो. काय चावले हे पहाण्यासाठीं तो उठला कीं, दुसरा त्याचें गांठोडें पळवितों गांठोडं पुढे घेऊन एखादी बाई बसलॉ म्हणजे एकजण तिच्यासमार लघवीला बसतो; कीं ती तोंड फिरविते आणि लागलेंच दुसरा तिचें गांठोडे लांबवितो. एखाद्या पैसेवाल्या गृह- स्थाच्या जवळपास भामट आपल्या पोराला खूप बदाडतात. तें पोर रडत ओरडत त्या गृहस्थाकडे धूम ठोकते. तो त्याला समजविण्यांत गुंतला असतां त्याचा माल ते घेऊन जातात आणि एकजण येऊन त्या पोरालाही घेऊन जातो. दिसण्यांत व वजनांत सराफाच्या थैलीसारखी आहे अशा एखाद्या थैलीत दगड किंवा खुर्दा भरून ती