पान:गुन्हेगार जाती.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भामटे. करतात. पण त्या पुरुषाइतक्या लांब प्रवास करीत नाहींत. टोळ्या करून जबरीच्या चोऱ्या, दिवसां अगर रात्रीं घरफोडी, चोरीचा माल घेणाराला घुलावून एकांतस्थळीं नेवून ठकविणें वगैरे गुन्हे कर्नाटकांतले घंटी चोर करतात. त्यांचेजवळ एकदां ४००० रुपयांचा दरोड्यांतला माल मिळाला. सोन्याच्या मण्यामोहराऐवजी पितळेच्या मोहरामणी ते गि-हाइकाच्या माथी मारतात ह्याला 'रामथडी ' ह्मणतात. गुन्ह्याची पद्धतिः - ते मुलांना लहानपणींच जोडे, नारळ, वगैरे पळविण्याला शिकवितात, आणि त्यांना हें बरोबर करतां आलें नाहीं तर यथेच्छ बडवितात. भामट्यांचीं पोरें मुलांच्या अंगावरील दागिने लांबविण्यांत पटाईत असतात. खुर्दा, खाऊ, किंवा दोरा बांधलेल्या भु- रंग्या मुलांना दाखवून त्यांना बाळभामटे एकांतस्थळीं चाळवीत नेतात, आणि तेथें त्यांचे दागिने काढून घेतात. चोरी कोठें करावयाची ह्याची माहिती मिळविण्याचे कामीं भामटे आपल्या पोरांची व बायकांची योजना करतात. त्यांचे घरफोडीसंबंधानें लिहिण्यासारखें कांहीं विशेष नाहीं. दोन, चार किंवा पांच भामटे एक होऊन कृष्णपक्षांत बगली पद्धतीनें गांवकुसा- जवळील घरांत घरफोडी करतात. टोळीच्या नायकाला 'रंगटेड ' ह्मण- तात, व त्याचा वांटा मोठा असतो. त्याचें काम घरांत शिरून माल काढणें हें होय. बाहेर राहिलेले इसम दगड घेऊन पाळत करतात. रंग- टेडाची घरांतून सुटका करणें झाल्यास किंवा पाठलाग करणारांना पिटाळणें झाल्यास भामटे दगड मारतात, एरव्हीं मारीत नाहींत. त्यांची रस्तालूट करण्याची पद्धत पुढे लिहिल्याप्रमाणें आहे: भाटांचा (जोशी) वेष • घेऊन भामट्यांची टोळी एखाद्या यात्रेला किंवा बाजाराला जाते. तेथें धनाड्य इसमाला कोठें जावयाचें वगैरे माहिती काढून, रस्त्यावर सोईस्कर जागीं ते दबा धरून बसतात व त्यांना लुटतात. ह्याच वेषानें ते खेड्या- पाड्याला जातात व गांवच्या एखाया वाचाळ मुलाला गांडून तेथील श्रीमंत गृहस्थांची व त्यांच्या कुटुंबांत घडलेल्या गोष्टींची माहिती त्याज़- २