पान:गुन्हेगार जाती.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ गुन्हेगार जाती. लावितात. बरे असतात ते दुकानदारी व सावकारी करतात. ज्यांना पुष्कळ जमीन व गुरे ढोरें असतात, ते तेव्हांच जामीन पटवितात. जामीनकीची मुदत संपेपर्यंत ते बिलकुल गुन्हा करीत नाहींत. बाजाराला जाऊन पोट भरतों " असें ते बिनदिक्कत सांगतात. वेषांतर:- भामटे म्हटले म्हणजे महा बहुरूपी. ते भिकाऱ्यांपासून तों सरदारांपर्यंत वाटेल त्याचा वेष घेतील. वारा वाहील तसें तोंड फिर- विण्यांत व साखर पसरण्यांत त्यांची शर्थ असो. खाऊन पिऊन सुखी अशा यात्रेकरूप्रमाणें किंवा मुलुखगिरीला निघालेल्या मराठ्याप्रमाणें ते बहुशः पोषाख करतात. उद्योग पाहण्यासाठी निघालेल्या गरीब मराठ्याचें ते वेळेवर सोंग घेतात. श्रीमंत मारवाडी, किंवा हिंदू व्यापारी, जंगम, लिंगायत, ब्राह्मण, धनगर, साधु, भिक्षुक, सनादी कोरवा ( वाजंत्री ) किंवा दक्षिणी भाट यांच्या वेषाने ते पुष्कळ वेळां हिंडतात. ह्यामुळे रेल्वे, देवळें वगैरे ठिकाणीं त्यांना प्रतिष्ठितपणानें जातां येतें. मुंबईच्या चाळीं- तून ते मराठे म्हणून वावरतात. नांवें बदलून त्यांची टोळी शहरांत पुष्कळ दिवस राहते, व त्यांच्या बायकाही त्यांच्याकडे येतात. तेथून पुरुष रेल्वेनें लांबवर यात्रा वगैरे ठिकाणी चोऱ्या करण्याला मधून मधून जातात; आणि वयाच्या अभावामुळे व त्यांच्या संशयी हालचालीमुळे त्यांच्याबद्दल पुस- तपास सुरू झाला की, ते लागलीच नाहींसे होतात. कधीं कधीं एकजण साधु किंवा वैद्य बनतो, व टोळींतले इतर लोक त्याचे चेले बनतात, आणि लोकांना भोंदवितात. विजापूरकडील घंटीचोर मध्यप्रांतांत आपणाला कंगवाला लणवितात. गुन्हे:- गर्दीत उचलेगिरी व रेल्वेवर चोरी हा ह्या जातीचा मुख्य धंदा होय. अलीकडे बारा किंवा अधिकजणांच्या टोळ्या करून ते जबरीच्या चोऱ्या व घरफोडी करूं लागले आहेत. त्यांच्या बायकाही बाजार, देवळें, यात्रा, आगगाडींत बायकांचे डबे वगैरे ठिकाणीं चोऱ्या