पान:गुन्हेगार जाती.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भामदे. १५ भामटा आधीं खोकून मग खाकरला ह्मणजे जपून अस, असें त्याचे भिडूनें समजावें. जवळपास पोलीस असल्यास तो हलकं खोकतो व खाकरतो. अमके बाजूस भीति आहे असे सुचविणें झाल्यास भामटा आपले डोकें खाजवितो व कोंपर त्या बाजूस करतो. तुजवर डोळा आहे असें सुच- विणें झाल्यास डोकें खाजवितांना ते कोंपर मागच्या बाजूस नेतात. मजवर पोलिसचा डोळा आहे असें आगगाडींतून उतरणाऱ्या सोबत्याला सुचविणें झाल्यास ते आपल्या हाताभोंवतीं उपरण्याचा एक पदर गुंडाळतात; आणि उतरूं नको असें सुचविणें झाल्यास गाडी जाणार तिकडे डोकें खाजवीत आपला कोंपर नेतात. संकेतस्थानीं पुनः जमण्याचें ठरवून जेव्हां ते लहान लहान तुकड्या करून जातात, तेव्हां प्रत्येक तुकडी इतर तुकड्यांना माहीत आहे अशा जवळपासच्या जागीं कांहीं माल किंवा पैसे पुरून ठेवते. सदर माल त्या ठिकाणीं सांपडला नाहीं झणजे समजावें कीं, तो माल पुरून ठेवणारी तुकडी येऊन गेली. मुक्काम हलविण्यापूर्वी भामटे चुलीचे दगड एके ठिकाणी जमवितात, असे कीं त्यांची वरील बाजू एकमेकांस लागावी. तळावर असे दगड दिसले म्हणजे समजावें कीं ते पुढे सरकले, सदर दगडांजवळ पायाच्या कडेनें माती उकरून तिजवर पाऊल वठविलेले दिसलें, ह्मणजे ज्या बाजूला माती उकरली असते, त्या बाजूला ते गेले असें समजावें. असली खूण चुलीपासून पन्नास यार्डी- पर्यंत असते. दोन वाटांचा चौक होतो तेथें पन्नास ते शंभर याचे अंतरावर अशा दोन तीन खुणा ते करतात. आपल्या जोडीदारांच्या पाव- लांचा माग काढण्यांत ते मोठे तरबेज असतात. त्यांच्यांत करपल्लवी व नेत्रपल्लवी असते. तिच्या योगानें पूर्वीची ओळख नसली तरी ते एकमेकांना ओळखतात व आपले मनोदय कळवितात. उपजीविकेची दर्शनी साधनें :- भामटे खेड्यांतले धंदे, शेती शेतकाम करतात. पण ते आपली जमीन दुसऱ्यांना - बहुधा पाटलांना-