पान:गुन्हेगार जाती.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ गुन्हेगार जाती. तालुक्यांत बालेहुसूर. कोल्हापूर संस्थान:- शिरोळ तालुक्यांत दनोली, शिरगांव. सांगली संस्थान:- सांगलीजवळ कौलापूर. अक्कलकोट संस्थानः- अंकलगी, बर्गुडी, कोनली, ( येथें भामटे कालीच्या दर्शनास जातात,) भगेली. माळवा:- देवास. निजामशाही:- सिद्धपूर, मुंगाशी, एकनाथवाडी, येल्लमवाडी, भैरवाडी, श्रीपतवाडी, ओकर्डी, खरुंडी. गुन्ह्याचें क्षेत्रः - भामट्यांचा प्रलय सर्व हिंदुस्थानभर आहे. रेल्वे, बंदरें, बाजार, देवळें, यात्रा वगैरे गर्दीच्या ठिकाणीं भामटे आपले ठेवले- लेच. प्रवासांत सोबतीच्या मुशाफरांनाही ते सोडीत नाहीत. पण त्यांचा विशेष भर रेल्वेवर असतो. कारण रेल्वेंत झालेली चोरी मालकाला बऱ्याच वेळानें कळते; तोंपर्यंत भामटा कोठेंच्या कोठें शेंकडों मैल मागेंच उतरलेला असतो. कोठें चोरी झाली आणि कोणाचें नांव घ्यावें ह्याचें मालकाला गूढ पडतें, व त्यामुळे पोलिसाचेही पाय मोडल्यासारखे होतात. जेव्हां बायकापोरांनिशीं भामट्यांचीं बिन्हाडेंचीं बि-हाडें चोऱ्यांसाठीं लांब लांब प्रवास करतात, तेव्हां ते बाग, धर्मशाळा, देवळें वगैरे ठिकाणीं उतरतात; आणि थाप मारतात की आह्मी दुष्काळी मुलुखांतले मराठे शेतकरी असून पोट भरण्याला निघालों आहोंत. - लोकसंख्या:- सुमारें ६०० पुरुष व ६०० बायका अशी त्यांची खानेसुमारी आहे; पण ती बरोबर नसावी. स्वरूपः- महार, मांग, चांभार, ढोर, बुरूड, टाकून बेरडांसुद्धां सर्व जातींचे हिंदु आणि मुसलमान ह्यांना भामटे लोक आपल्या जातींत घेतात. इतर जातींची मुलें लहानपणींच घेऊन त्यांना ते आपला धंदा शिकवितात. अशा मुलांना 'कोन्नड ' अगर 'गोल्ड' ह्मणतात; आणि मुलींना 'कोन्नडी ' ह्मणतात. एखाद्या कुलवान् स्त्रीचें वांकडें पाऊल पडलें तर भामटे तिला आसरा देऊन तिचें मूल ठेवून घेतात, आणि लुगडें, चोळी, व वर रुपया दोन रुपये देऊन तिची बोळवण करतात. दरएक गांवीं