पान:गुन्हेगार जाती.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भामटे. १३ सर्वांत वडील भामटा नाईक असतो, त्याला पाटील, तालमड, तालदरू अगर कट्टिमनी ह्मणतात. जातीच्या पंचायती तो मिटवितो. आपल्या साथीदारांना चोरून एखाद्यानें, चोरीचा माल बळकाविला किंवा एखाद्या स्त्रीनें व्यभिचार केला, तर तेलरवा अथवा तेलगोटी करण्याचा भामट्यां- मध्ये रिवाज आहे. कढत तेलांतून गोटी किंवा पैसा काढावयाचा, ज हात भाजला नाहीं तर तो इसम किंवा औरत निर्दोषी आहे असें सम- जावें. पाण्यांत हात भिजवून कढत तेलांत घालून चलाखीने बाहेर काढला तर त्याला इजा होत नाहीं असें ह्मणतात. , भामटे खुजट, टणक, चपळ व जातिसंकरामुळे कांहीं काळे व कांहीं नि- मगोरे असतात. भामटिणी देखण्या पण व्यभिचारी असतात. त्यांची रहाणी डौलाची नसते, तरी एकंदरीत ते कपडालत्ता चांगला वापरतात. भाम- टिणी नथ घालतात, उजवे हातापेक्षां डावे हातावर जास्त गोंधून घेतात व हातातोंडावरही गोंधतात आणि कधीं कधीं मराठे-ब्राह्मणांच्या बायकां- प्रमाणें पोषाख करतात. चोरीला निवाला ह्मणजे भामटा कधीं गाफील नसतो, तो एके जागीं फार वेळ ठरत नाहीं व त्याची नजर चोहोंकडे असते. चोरींत निष्णात ठरल्याशिवाय भामट्याला बायको मिळत नाहीं. त्यांची कैकाड्यांशीं सोयरीक होते. ते फार खादाड व दारूबाज अस तात आणि गांवडुकरें खातात. भाषा:- एकमेकांत ते वडारी बोली बोलतात. त्यांना मराठी, हिंदु स्थानी व कानडी येतें. विजापुर जिल्ह्यांत राहणारे घंटी चोर घरीं कानडी भाषा बोलतात. उल्मुख अथवा, वाघनख फुड्डूड, गोषड कट्टेड सांकेतिक शब्द. ओचखर डांगिकुशी वाकडा चाकू. फौजदार, इन्स्पे- नेल्ला, कुछलु यरवेलक वैपल क्टर. पोलीस. आला. लप. कान्स्टेबल. सोन्याचे दागिने. रुपये.