पान:गुन्हेगार जाती.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुन्हेगार जाती. कोर्टाचे हवींची त्यांना चांगली माहिती असते, त्या बेतानें ते गुन्ह्याचें ठिकाण ठरवितात. दरोडे वगैरे घालण्याची त्यांची पद्धति जवळजवळ रामोशासारखी असते. 'बगली' ( हात जाईल असें चौकटीजवळ भोंक पाडून ) अगर ' रुमाली ' ( अंग जाईल असें भिंतीला धारें पाडून ) पद्धतीने ते घरफोडी करतात. ते स्वतः अगर गांवच्या गुन्हेगाराकडून खबर काढतात. पुष्कळ वेळां अदावतवाले आपल्या वैऱ्याचें घर फोड- ण्यासाठीं त्यांना बोलावून घेतात. गुन्हा करण्याचे काम कोणत्याही दुस- या जातीच्या लोकांची ते संगत करतात. ते कैकाडी लोकांसारखे क्रूर व गुन्ह्याचे वेळीं निष्कारण इजा करणारे नसतात. गुन्ह्याचीं हत्यारें:- 'कंगट्टी' (अठरा इंच लांच, दीड इंच व्यास • असा, एका टोंकाला चपटा होत गेलेला लोखंडी बत्ता ) 'अरसुकुंची ( अठरा इंच लांबीचा टिकाव ) हीं त्यांची घरफोडीचीं हत्यारें होत. दरोडा किंवा जबरीच्या चोरीच्या वेळी त्यांचे जवळ कुन्हाड, पहार, विळा, काठ्या, गोफणगुंडे, व अपटबार हीं असतात, व मिळाल्यास तलवार, बंदूकही बरोबर नेतात. , चोरीच्या मालाची निर्गतिः- चोरीचा माल ते जंगलांत, झाडा- खालीं, किंवा ओड्यांत अगर अशाच दुसऱ्या ठिकाणीं पुरून ठेवितात, आणि संधि सांपडली ह्मणजे सोनार, कलाल, सावकार, पाटील-कुळ- कर्णी ह्यांना विकतात. चोरलेल्या जनावरांची काय वाट लावितात हें वर आलेंच आहे. भामटे. संज्ञा:- हे घंटी चोर, उचले, खिसेकातरू, टकारी, वडारी, कल- वडरू, तुडुग वडरू, कामाठी आणि पाथरट या नांवांनींही ओळखले जातात.