पान:गुन्हेगार जाती.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बेरड. भाषा:- ह्यांची भाषा अशुद्ध कानडी आहे. महाराष्ट्राचे लगत्याला जे राहतात ते अशुद्ध मराठी किंवा हिंदुस्थानी बोलतात. बेळगांवनजीक ते वड्डरी बोलतात. सांकेतिक भाषा या लोकांत नाहीं. उपजीविकेचीं दर्शनी साधनें:- ह्या जातीचे पुष्कळ लोक मेह- नती व इमानी आहेत. कांहीं थोडे जाहगिरदार, वतनदार व पाटील आहेत; आणि पुष्कळ सनदी ( गांवपोलीस ) जागले, शेतकरी, गुराखी, हमाल व गिरणींत मजूर आहेत. कांहीं गाडीवाले, लांकूडविके व पोलीस आहेत. कांहीं बेरडणी कसब करतात त्यांना 'जोक्तर' ह्मणतात. - वेषांतर:- ते आपणांला उंच जातीचे हिंदू, किंवा जनावरें विक ण्याचा धंदा करणारे ( हेडे ) ह्मणवितात. गुन्हा करतांना तोंडाला राख वगैरे फांसून ते डोक्यावर घोंगडी घेतात. गुन्हेः- ते मुख्यत: टोळी करून रस्तालूट, घरावर दरोडा, जनावरें, मेंढ्या चोरणें, पिकें चोरणें, घरफोडी व लहान चोऱ्या इत्यादि गुन्हे कर तात. जानेवारी ते मेपर्यंत ते बहुधा लहान अगर जबरीची चोरी, दरोडा, जनावरें चोरणें, वगैरे गुन्हे करितात; जून ते आक्टोबरपर्यंत घरफोड्या करतात, आणि नोव्हेंबर ते जानेवारी शेतकाम किंवा दुसरा इमानी रोजगार करतात. गुन्ह्याची पद्धतिः- मेंढवाड्यांतून किंवा जाळ्यांतून मेंढ्या चोरणें झाल्यास हातांत वाघनख घालून रानटी जनावराप्रमाणें आविर्भाव घालून ते कळपांत शिरतात. गोठ्यांतून चोरलेली जनावरें ते जंगलांत नेऊन बांधून ठेवितात. मालकानें अडत्यामार्फत निमीशिमी किंमत दिली तर त्यांना ते एखाद्या नेमल्या जागी नेऊन सोडतात अगर कोंडवाड्यांत घाल- तात, व तेथें फी भरून मालक त्यांना सोडवितो. पोलीसकडे फिर्याद वगैरे देण्याचा मालकाचा झोंक दिसला तर जनावरें मारून टाकतात; किंवा त्यांचे शिंगांचा आकार बदलून एकएक दोनदोन लांबच्या बाजारांत किंवा यात्रेंत विकतात.